ब्रसेल्समध्ये शॉपिंग सेंटरजवळ बॉम्ब अलर्ट, संशयित ताब्यात
By Admin | Updated: June 21, 2016 12:49 IST2016-06-21T12:34:40+5:302016-06-21T12:49:57+5:30
मध्य ब्रसेल्समध्ये शॉपिंग सेंटरजवळून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडे स्फोटके असण्याची शक्यता आहे.

ब्रसेल्समध्ये शॉपिंग सेंटरजवळ बॉम्ब अलर्ट, संशयित ताब्यात
ऑनलाइन लोकमत
ब्रसेल्स, दि. २१ - मध्य ब्रसेल्समध्ये शॉपिंग सेंटरजवळून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या संशयितांकडे स्फोटके असण्याची शक्यता आहे. शॉपिंग सेंटरच्या परिसरात व्यावसायिक केंद्र असून, हा भाग सध्या बंद करण्यात आला आहे.
ब्रसेल्स बेल्जियमची राजधानी आहे. लष्कराचे बॉम्ब निकामी पथक दाखल झाले आहे, बेल्जियमच्या आपत्ती निवारण केंद्राची पंतप्रधान चार्ल्स मायकल यांच्याबरोबर चर्चा सुरु आहे.
तीन महिन्यांपूर्वी मार्च महिन्यात ब्रसेल्स विमानतळावर दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी विमानतळावर झालेल्या दोन शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी युरोप हादरले होते.