इस्लामाबाद : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानलापाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने 'दहशतवादी' घोषित करत 'फोर्थ शेड्युल' (Fourth Schedule) मध्ये टाकले आहे. सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख केल्याने पाकिस्तान सरकार बिथरले असून, अँटी-टेररिज्म ॲक्ट (Anti-Terrorism Act) अंतर्गत ही सलमान खानवर ही कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाला होता सलमान खान - सौदी अरेबिया येथे आयोजित जॉय फोरम 2025 मध्ये बोलतानाचा बॉलिवुड सुपरस्टार सलमान खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबदस्त व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्या म्हटले आहे, "हे बलुचिस्तानातील लोक आहेत, अफगाणिस्तानातील लोक आहेत, पाकिस्तानातील लोक आहेत, प्रत्येक जण सौदी अरेबियामध्ये कष्टकरून कमवत आहे." या विधानात त्याने बलुचिस्तानचे नाव पाकिस्तानपासून वेगळे घेतले. त्याच्या या एका विधानाने पाकिस्तानमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, शहबाज सरकारने त्यांला थेट दहशतवादी घोषित करत कायदेशीर कारवाईची तयारी केली आहे.
दुसरीकडे, बलुचिस्तानच्या फुटीरतावादी नेत्यांनी मात्र सलमान खानचे आभार मानले आहेत. बलुचिस्तानला स्वतंत्र देश मानणाऱ्या मीर यार बलूच यांनी, हा सांस्कृतिक मान्यतेचा संकेत असून सौम्य मुत्सद्देगिरीचे शक्तिशाली माध्यम' (Powerful medium of soft diplomacy) असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, यामुळे जगाला बलुचिस्तानला वेगळे राष्ट्र म्हणून मान्यता देण्यासाठी प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वाधिक खनिज समृद्ध पण आर्थिकदृष्ट्या सर्वात मागासलेला प्रांत आहे. येथील जनतेसोबत होणारा भेदभाव, यामुळे येथील जनतेत पाकिस्तानविरोधात मोठा असंतोष आहे.
पाकिस्तानच्या या कारवाईसंदर्भात, सलमान खान अथवा त्यांच्या प्रतिनिधींकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, एका विधानावरून सलमानला दहशतवादी घोषित केल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर, या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.
Web Summary : Pakistan declared Salman Khan a terrorist for mentioning Balochistan separately at a Saudi event. Baloch separatists thanked him, while Pakistan's move sparks international debate. No response from Khan yet.
Web Summary : पाकिस्तान ने सऊदी अरब में बलूचिस्तान का अलग से उल्लेख करने पर सलमान खान को आतंकवादी घोषित किया। बलूच अलगाववादियों ने धन्यवाद दिया, जबकि पाकिस्तान के कदम से अंतरराष्ट्रीय बहस छिड़ गई। खान की ओर से अभी तक कोई प्रतिक्रिया नहीं।