शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निळ्या डोळ्यांची ही चिमुकली ठरतेय जगातील सगळ्यात सुंदर लहान मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 14:55 IST

रशियाची या सहा वर्षांच्या मॉडेलचे फोटो पाहाल तर तुम्हाला बाहुली आणि परीमधला फरक ओळखणं कठीण होईल.

ठळक मुद्देअवघ्या 6 वयाच्या या चिमुरडीचे आता 8 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. ती अवघ्या 4 वर्षांची असतानाच तिच्या आईने इन्स्टाग्राम अकाऊंट बनवलं होतं. हुबेहुब एखाद्या बाहुलीप्रमाणे दिसणाऱ्या या चिमुकलीला नेटिझन्ससाठी जगातील सगळ्यात सुंदर लहान मॉडेल जाहीर केलं आहे.

रशिया : सध्या सोशल मीडियावर एक फोटो बराच व्हायरल होतोय. या फोटोतली चिमुरडी जगातील सगळ्यात सुंदर लहान मॉडेल असल्याचा दावा नेटिझन्सने केला आहे. निळ्या डोळ्यांची ही चिमुकली सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरलीय. अवघ्या 6 वर्षांच्या असलेल्या या लहान मॉडेलचे इन्स्टाग्रामवर फॉलोवर्सही अधिक आहेत.

मिरर युकेने दिलेल्या वृत्तानुसार, रशियात राहणाऱ्या या अवघ्या सहा वर्षांच्या मॉडेलचं नाव आहे अ‍नेस्तिया कोनेजेवा. रशियातील एका कपड्याच्या ब्रॅण्डसाठी तिनं मॉडलिंग केलं होतं. त्यावेळी तिचे काही फोटो काढण्यात आले आणि आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गोरापान चेहरा आणि त्यावर निळे डोळे म्हणजे एखाद्या मॉडेललाही मागे टाकेल असेच या चिमुरडीचे सौंदर्य आहे. 

आणखी वाचा - नेलआर्ट जुनं झालं आता आलीये फेसआर्टची फॅशन?

अनास्तियाची आई अ‍ॅना हिने अनास्तिया अवघ्या 4 वर्षांची असतानाच तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट बनवलं होतं. तेव्हापासून ती अ‍नेस्तियाचे फोटो इन्स्टाग्रामवर टाकते. तिच्या प्रत्येक फोटोला क्षणार्धात हजारोंनी लाईक्स आणि कॉमेंन्टस पडतात. त्यामुळे दिवसेंदिवस तिचे फॉलोव्हर्सही वाढत गेलेत. अवघ्या 6 वयाच्या या चिमुरडीचे आता 8 लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. 

रशियातील रुसी ब्रँड चोबी किड्ससाठी ती मॉडेलिंग करते. तसंच त्यांच्या अ‍ॅड कॅम्पेनमध्येही तिने सहभाग घेतला होता. हुबेहुब एखाद्या बाहुलीप्रमाणे दिसणारी ही अ‍नेस्तिया नेटिझन्ससाठी जगातील सगळ्यात सुंदर लहान मॉडेल ठरली आहे. तिचं मनमोहक रुप सगळ्यांनाच आकर्षित करणारं आहे. दिवसेंदिवस तिच्या प्रत्येक फोटोला लाईक्स आणि कॉमेंट्स वाढत जात असल्याचेही सांगण्यात येतय.

एखाद्या अभिनेत्रीलाही मागे पाडेल असं तिचं सौंदर्य आहे, असं काहींनी म्हटलं आहे. तर तिचे डोळेच तिच्या सौंदर्याला अधिक खुलवत असल्याचं काहींनी म्हटलंय. चित्रात दिसणारी खरेच एखादी व्यक्ती आहे की एखाद्या बाहुलीचा फोटो आपण पाहतोय अशी प्रतिक्रियाही काही नेटिझन्सनी दिली आहे. सौंदर्याची व्याख्या द्यायची झाली तर अ‍नेस्तियाचं नाव घेतलं पाहिजे असंही काही म्हणतात. आपल्या सौंदर्यामुळे जगभर किर्तीवंत ठरलेली ही अ‍नेस्तिया आता अनेक मॉडेलिंग आणि अ‍ॅड कॅम्पेनसाठी सज्ज झाली असल्याचे तिच्या आईने सांगितलंय.

जरा हटके बातम्यांसाठी येथे क्लिक करा.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयInstagramइन्स्टाग्रामSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया