ब्रिटनमध्ये साकारताेय थक्क करणारा ‘ब्लू ॲबिस’; जगातील सर्वांत माेठा जलतरण तलाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 07:08 IST2021-06-04T07:08:09+5:302021-06-04T07:08:27+5:30
ऑलिम्पिक स्पर्धेत उपयाेगात येणाऱ्या तब्बल १७ तलावांच्या बराेबरीचा हा तलाव राहणार असून त्याचा वापर प्रामुख्याने अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येणार आहे.

ब्रिटनमध्ये साकारताेय थक्क करणारा ‘ब्लू ॲबिस’; जगातील सर्वांत माेठा जलतरण तलाव
लंडन : ब्रिटनमध्ये सर्वांनाच थक्क करणारा ‘ब्लू ॲबिस’ साकारत आहे. हा जगातील सर्वात माेठा जलतरण तलाव ठरणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत उपयाेगात येणाऱ्या तब्बल १७ तलावांच्या बराेबरीचा हा तलाव राहणार असून त्याचा वापर प्रामुख्याने अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येणार आहे.
ब्रिटनच्या काॅर्नवाॅल येथे हा भव्य असा ‘ब्लू ॲबिस’ उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी भव्य प्रशिक्षण केंद्र आहे. तलावाच्या केंद्रस्थानी ५० बाय ४० मीटर क्षेत्रफळ आणि ५० मीटर खाेली असलेला एक तलाव राहणार आहे.
अंतराळवीरांसाेबत संरक्षण, सागरी तसेच इतर क्षेत्रातील तज्ज्ञांनाही या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रथम अंतराळवीर डाॅ. हेलन शेरमन यांनीही ‘ब्लू ॲबिस‘ प्रकल्पाला समर्थन दिले आहे.
काय आहेत तलावात सुविधा
या तलावात तब्बल ४२ हजार क्युबिक मीटर पाणी साठविण्याची क्षमता.
ऑलिम्पिकसाठी वापरण्यात येणाऱ्या १७ तलावांएवढा हा तलाव भव्य राहणार आहे.
वार्षिक ८ दशलक्ष पाउंड उलाढाल.
जगभरातील अंतराळवीर व इतर अंतराळ क्षेत्रातील व्यावसायिक याचा लाभ घेऊ शकतील.
या ठिकाणी स्पा व इतरही अद्ययावत सुविधा राहणार आहेत.