शहरं
Join us  
Trending Stories
1
"१० वर्षे सत्तेत होता, खोलात जायला लावू नका"; आरक्षणावरुन शरद पवारांच्या सल्ल्यावर अजितदादांचे प्रत्युत्तर
2
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
3
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
4
कहानी में ट्विस्ट! शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी मेलानिया ट्रम्प यांच्या नावाचे नामांकन?
5
आजचे राशीभविष्य, ३१ ऑगस्ट २०२५ : आजचा दिवस शुभ फलदायी, धन लाभ होईल, मानसिक शांतता लाभेल !
6
Mumbai Police: मुंबई पोलीस, गुन्हे शाखेच्या पोलिसांच्याही सुट्ट्या रद्द!
7
शेकडो टॉयलेट, ११ टँकर, ४५० कर्मचारी; आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना
8
हलगीचा ताल, झांजेच्या झंकाराने निनादले रस, आंदोलकांचा नाचत जल्लोष 
9
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
10
Uddhav Thackeray: सरकारने तुमच्या मागण्यांबाबत...; उद्धव ठाकरेंचा जरांगेंना फोन!
11
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
12
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
13
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
14
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
15
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
16
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
17
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
18
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
19
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
20
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ

शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:16 IST

Blood Money in Sharia Law: केरळची रहिवासी असलेली निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Blood Money in Sharia Law: केरळची रहिवासी असलेली निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. २०१८ मध्ये येमेनच्या न्यायालयाने तिला या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. निमिषाला आज (१६ जुलै) फाशी देण्यात येणार होती, परंतु सध्या ती पुढे ढकलण्यात आली आहे. येमेनचे अध्यक्ष रशाद अल-अलीमी यांनी या वर्षी जानेवारीमध्ये तिच्या शिक्षेला मान्यता दिली होती. भारत सरकार तिला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या निमिषा प्रियाला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'ब्लडमनी'. शरिया कायद्यानुसार इस्लामिक देशांमध्ये 'ब्लड मनी' खूप प्रचलित आहे. पण, हा नेमका काय प्रकार आहे. ? जाणून घ्या....

शरिया कायद्यात 'ब्लड मनी' कसे कार्य करते?इस्लाममध्ये बदलाची भावना Qisas नावाच्या शरिया कायद्यावर आधारित आहे. ज्याचा अर्थ मृत्यूच्या बदल्यात मृत्युदंड. खुनाच्या खटल्यात पीडित कुटुंब गुन्हेगाराला शिक्षा म्हणून मृत्युदंडाची मागणी करू शकतात. यातून वाचण्याचा मार्ग म्हणजे 'ब्लड मनी' आहे. इस्लामिक शरिया कायद्यात ब्लड मनीला दीया असे म्हणतात. उदाहरणार्थ, खून किंवा इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्यात आरोपी पीडित कुटुंबाला आर्थिक भरपाई देतो. शरिया कायद्यानुसार खून दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे जाणूनबुजून केलेला आणि दुसरा म्हणजे अपघाती खून. शरिया कायद्यानुसार, जाणूनबुजून केलेल्या खुनासाठी मृत्युदंडाची शिक्षा आहे.

खून चुकून झाला असेल, तर कुराणातील आयत (४:९२) नुसार, ब्लड मनी दिली जाते. जर मृत व्यक्तीच्या वारसांनी स्वतःहून शिक्षा माफ केली, तरच त्यांना तसे करण्याची परवानगी आहे. अशा प्रकरणांमध्ये ठरलेली रक्कम पीडित कुटुंबाला दिली जाते. इस्लामिक विद्वानांच्या मते, याचा उद्देश माफीला प्रोत्साहन देणे आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करणे आहे. आता निमिषा प्रियाच्या प्रकरणात 

हत्येच्या प्रकरणात झाली होती फाशीची शिक्षाकेरळची रहिवासी असलेल्या निमिषा प्रियाला तिचा बिझनेस पार्टनर तलाल अब्दो महदी याच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. २०२०मध्ये यमनच्या न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती. २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायिक परिषदेने तिची माफी याचिकाही फेटाळली होती. परंतु, आता सुरू असलेल्या चर्चेमुळे स्थानिक तुरुंग न्यायालयाने फाशीची अंमलबजावणी तात्पुरती पुढे ढकलली आहे.