शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:16 IST2025-07-16T19:00:08+5:302025-07-16T19:16:55+5:30

Blood Money in Sharia Law: केरळची रहिवासी असलेली निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Blood Money in Sharia Law: last way to save Nimisha Priya's life | शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग

शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग

Blood Money in Sharia Law: केरळची रहिवासी असलेली निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. २०१८ मध्ये येमेनच्या न्यायालयाने तिला या प्रकरणात मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. निमिषाला आज (१६ जुलै) फाशी देण्यात येणार होती, परंतु सध्या ती पुढे ढकलण्यात आली आहे. येमेनचे अध्यक्ष रशाद अल-अलीमी यांनी या वर्षी जानेवारीमध्ये तिच्या शिक्षेला मान्यता दिली होती. भारत सरकार तिला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, येमेनमध्ये मृत्युदंडाची शिक्षा भोगत असलेल्या निमिषा प्रियाला वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे 'ब्लडमनी'. शरिया कायद्यानुसार इस्लामिक देशांमध्ये 'ब्लड मनी' खूप प्रचलित आहे. पण, हा नेमका काय प्रकार आहे. ? जाणून घ्या....

शरिया कायद्यात 'ब्लड मनी' कसे कार्य करते?
इस्लाममध्ये बदलाची भावना Qisas नावाच्या शरिया कायद्यावर आधारित आहे. ज्याचा अर्थ मृत्यूच्या बदल्यात मृत्युदंड. खुनाच्या खटल्यात पीडित कुटुंब गुन्हेगाराला शिक्षा म्हणून मृत्युदंडाची मागणी करू शकतात. यातून वाचण्याचा मार्ग म्हणजे 'ब्लड मनी' आहे. इस्लामिक शरिया कायद्यात ब्लड मनीला दीया असे म्हणतात. उदाहरणार्थ, खून किंवा इतर कोणत्याही गंभीर गुन्ह्यात आरोपी पीडित कुटुंबाला आर्थिक भरपाई देतो. शरिया कायद्यानुसार खून दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे जाणूनबुजून केलेला आणि दुसरा म्हणजे अपघाती खून. शरिया कायद्यानुसार, जाणूनबुजून केलेल्या खुनासाठी मृत्युदंडाची शिक्षा आहे.

खून चुकून झाला असेल, तर कुराणातील आयत (४:९२) नुसार, ब्लड मनी दिली जाते. जर मृत व्यक्तीच्या वारसांनी स्वतःहून शिक्षा माफ केली, तरच त्यांना तसे करण्याची परवानगी आहे. अशा प्रकरणांमध्ये ठरलेली रक्कम पीडित कुटुंबाला दिली जाते. इस्लामिक विद्वानांच्या मते, याचा उद्देश माफीला प्रोत्साहन देणे आणि पीडित कुटुंबाला आर्थिक मदत करणे आहे. आता निमिषा प्रियाच्या प्रकरणात 

हत्येच्या प्रकरणात झाली होती फाशीची शिक्षा
केरळची रहिवासी असलेल्या निमिषा प्रियाला तिचा बिझनेस पार्टनर तलाल अब्दो महदी याच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. २०२०मध्ये यमनच्या न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती. २०२३ मध्ये सर्वोच्च न्यायिक परिषदेने तिची माफी याचिकाही फेटाळली होती. परंतु, आता सुरू असलेल्या चर्चेमुळे स्थानिक तुरुंग न्यायालयाने फाशीची अंमलबजावणी तात्पुरती पुढे ढकलली आहे. 

Web Title: Blood Money in Sharia Law: last way to save Nimisha Priya's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.