अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये शिरून तेथील राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ज्या पद्धतीने उचलले, त्याची अद्यापही संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे. या लष्करी ऑपरेशनदरम्यान अमेरिकेने एका असे 'मिस्ट्री वेपन' वापरले, ज्याने व्हेनेझुएलाचे सैनिक अक्षरशः गुडघ्यावर आले. या शस्त्राचा प्रभाव एवढा भयंकर होता की, व्हेनेझुएलाच्या सैनिकांना अक्षरशः रक्ताच्या उलट्या झाल्या आणि काहींच्या तर नाकातून ब्लड आले.
यासंदर्भात, 'न्यूयॉर्क पोस्ट'ने मादुरो यांच्या एका सुरक्षा रक्षकाच्या हवाल्याने वृत्त प्रसिद्ध केले आहे. संबंधित सुरक्षा रक्षकाने एका मुलाखतीत सांगितले की, "ज्या दिवशी अमेरिकेने ऑपरेशन केले, त्या दिवशी सर्व काही सामान्य होते. मात्र, अचानकच आमची रडार यंत्रणा बंद झाली. यानंतर आकाशात काही ड्रोन दिसले आणि लगेचच काही हेलिकॉप्टर्स दिसले. माझ्या मते ८ हेलिकॉप्टर्स असावीत. त्यांतून साधारणपणे २० US सैनिक खाली उतरले आणि शेकडो सैनिकांच्या सुरक्षा व्यवस्थेत असतानाही, त्यांनी राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना उचलले.
सैनिकांच्या नाकातून रक्त अन् रक्ताच्या उलट्या -संबंधित सुरक्षा रक्षकाने पुढे सांगितले की, "यावेळी अमेरिकन सैनिकांनी अत्यंत भयंकर आत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला. त्यांचा एक-एक सैनिक मिनिटाला ३०० राऊंड फायर करतोय की काय? असे वाटत होते. दरम्यान अमेरिकन सैनिकांनी कुठल्यातरी एका भयंकर शस्त्राचा वापर केला. त्याचा आवाड एवढा प्रचंड होता, की माझे डोके फुटत की काय, असे वाटू लागले. यानंतर, सैनिकांच्या नाकातून रक्त आले आणि अनेकांना रक्ताच्या उलट्याही सुरू झाल्या. आम्ही जमिनीवर कोसळलो. आम्हाला हालताही येत नव्हते."
"अमेरिकेचा सामना करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना माहीत नाही की..." -"त्या मुठभर सैनिकांनी ज्या पद्धतीच्या आत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला, आम्ही त्यांचा सामनाही करू शकलो नाही. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात आजवर तशा पद्धतीचे तंत्रज्ञान बघितले नाही. त्यांनी ज्या कुठल्या 'सोनिक वेपन'चा वापर केला, त्यासमोर आम्ही टिव धरू शकलो नाही. एवढेच नाही तर, "अमेरिकेचा सामना करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना माहीत नाही, अमेरिका काय करू शकते? त्या दिवशी मी जे काही बघितले, मी त्यांचा सामना करू शकणार नाही," असेही त्या सुरक्षा रक्षकाने म्हटले आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनीही व्हेनेझुएलाच्या सैनिकाचा हा वृत्तांत सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Web Summary : A Venezuelan security guard claims the US used a 'mystery weapon' during an operation, causing soldiers to vomit blood. The weapon caused radar systems to fail, causing headaches and internal bleeding, leaving them helpless against US forces.
Web Summary : एक वेनेजुएला सुरक्षा गार्ड का दावा है कि अमेरिका ने एक ऑपरेशन के दौरान एक 'रहस्यमय हथियार' का इस्तेमाल किया, जिससे सैनिकों को खून की उल्टी हुई। इस हथियार से रडार सिस्टम विफल हो गए, जिससे सिरदर्द और आंतरिक रक्तस्राव हुआ, और वे अमेरिकी सेना के खिलाफ बेबस हो गए।