ब्रसेल्समध्ये पोलिस इमारतीत बॉम्बस्फोट

By Admin | Updated: August 29, 2016 10:55 IST2016-08-29T10:49:27+5:302016-08-29T10:55:06+5:30

बेल्जिमयची राजधानी ब्रसेल्स शहर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले.

Blasts in police building in Brussels | ब्रसेल्समध्ये पोलिस इमारतीत बॉम्बस्फोट

ब्रसेल्समध्ये पोलिस इमारतीत बॉम्बस्फोट

ऑनलाइन लोकमत 

ब्रसेल्स, दि. २९ - बेल्जिमयची राजधानी ब्रसेल्स शहर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरले. ब्रसेल्सच्या क्रिमीनोलॉजी इन्स्टिट्युटमध्ये बॉम्बस्फोट झाला. बेल्जियमच्या स्थानिक वेळेनुसारी दुपारी २.३०च्या सुमारास बॉम्बस्फोट झाला. 
 
या स्फोटात अद्यापपर्यंत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. क्रिमीनोलॉजी इन्स्टिट्युटच्या कार पार्कींगच्या भागात हा स्फोट झाला. एक ते दोन संशयितांनी येथील प्रयोगशाळेजवळ स्फोट घडवून आणला. 
 
आणखी वाचा 
 
मार्च महिन्यात ब्रसेल्स विमानतळ परिसरात दोन आणि मेट्रो स्थानकात एक असे तीन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले होते. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. ज्यात ३२ लोकांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: Blasts in police building in Brussels