ब्लेडने पाठ फाडली, नखेही उपटली

By Admin | Updated: May 18, 2016 04:32 IST2016-05-18T04:32:40+5:302016-05-18T04:32:40+5:30

अतिरेक्यांनी माझा अनन्वित छळ केला. ते मला चाबकाने मारायचे.

Blade torn the tone, pulled the nails | ब्लेडने पाठ फाडली, नखेही उपटली

ब्लेडने पाठ फाडली, नखेही उपटली


इस्लामाबाद : अतिरेक्यांनी माझा अनन्वित छळ केला. ते मला चाबकाने मारायचे. तीन दिवसांत मला त्यांनी जवळपास ५०० फटके मारले. माझ्या पाठीवर ब्लेडने कापले आणि माझ्या हाता-पायांची नखेही काढून टाकली... अंगाचा थरकाप उडवणारी ही व्यथा मांडली आहे पंजाबचे हत्या झालेले गव्हर्नर सलमान तासिर यांचा मुलगा शाहबाज याने.
सलमान तासिर यांची हत्या झाल्यानंतर सात महिन्यांनी २०११ साली इस्लामिक मुव्हमेंट आॅफ उझबेकिस्तानच्या अतिरेक्यांनी लाहोरमधून शाहबाजचे (३३) अपहरण केले होते. पाकिस्तानी लष्करी जवानांनी शाहबाजची गेल्या मार्चमध्ये क्वेट्टातील कुचलक गावातील हॉटेल येथे अतिरेक्यांच्या तावडीतून सुटका केली.
मला त्यांनी अनेक दिवस अन्न दिले नाही. मी मलेरियाने आजारी असताना माझ्यावर उपचार केले नाहीत. एकदा तर त्यांनी माझे तोंडही शिवून टाकले होते, असे शाहबाज तासिर म्हणाला. इस्लामिक स्टेटशी (आयएस) कशी संलग्नता असावी या मुद्द्यावरून इस्लामिक मुव्हमेंट आॅफ उझबेकिस्तान आणि तालिबान यांच्यात मतभेद झाल्याचेही शाहबाज तासिर याने सांगितले. या मतभेदानंतर अफगाण तालिबानींनी उझबेकींवर हल्ला करून त्यांचा सगळा गटच व नेताही संपवून टाकला. संपूर्ण तीन दिवस तेथे केवळ मृत्यूचेच राज्य होते अशी आठवणही त्याने सांगितली.

Web Title: Blade torn the tone, pulled the nails