शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

आम्ही कोणाच्याही दारात भीक मागायला आलो नाहीत; लंडनमधील कार्यक्रमादरम्यान भाजप खासदाराचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 09:14 IST

आम्ही कोणाच्याही दारात भिकेचा कटोरा घेऊन उभे नाही आहोत, आम्ही फक्त तुम्हाला इशारा देण्यासाठी आलो आहोत, भाजपचे खासदार समिक भट्टाचार्य म्हणाले.

BJP MP Samik Bhattacharya Speech: पहलगाम हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूरद्वारेपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर, भारत आता जागतिक स्तरावर पाकिस्तानची पोलखोल करत आहे. पाकिस्तानमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर भारताची जगभरातील सर्वपक्षीय शिष्टमंडळे सध्या पाकचा खोटेपणा उघड करत आहेत. अशातच लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात, भाजपचे खासदार समिक भट्टाचार्य यांनी पाकिस्तानातल्या दहशतवादावरुन कडक इशारा दिला. आमच्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही होऊ शकतो हेच सांगायला इथे आलो असल्याचे समिक भट्टाचार्य म्हणाले. यावेळी भट्टाचार्य यांनी इंग्लंडचे नाव न घेता, भारतावरील इंग्लंडच्या राजवटीचा आणि त्यांनी लुटलेल्या संपत्तीचाही उल्लेख केला.

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर, भारत जगभरात सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या माध्यमातून आपली बाजू मांडत आहे. भारतीय शिष्टमंडळे सातत्याने जगाला दहशतवादापासून सावध राहण्याचे आवाहन करत आहे. तसेच पाकिस्तानचा खरा चेहरा देखील जगासमोर आणत आहेत. यादरम्यान सोमवारी लंडनमध्ये एका कार्यक्रमादरम्यान भाजप खासदार समिक भट्टाचार्य यांनी स्पष्ट शब्दात भारत जगाकडून कोणतीही भीक मागत नाहीये, तर दहशतवादाच्या वाढत्या धोक्याविरुद्ध स्पष्ट इशारा देत आहे असं म्हटलं.

"भारत हातात वाटी घेऊन कोणाच्याही दारावर उभा नाहीये. आम्ही जगभर फिरत आहोत. आम्ही युरोपमध्ये येऊन कोणाचेही दार ठोठावून कहों ना प्यार है, कहो ना प्यार है? असं म्हणत नाही आहोत. आम्ही इथे भिक्षा मागण्यासाठी आलो नाहीये. आम्ही इथे इशारा देण्यासाठी आलो आहोत, सावध करण्यासाठी आलो आहोत की आज आमच्यासोबत जे काही घडत आहे, उद्या तुमच्यासोबतही तेच घडणार आहे. तुम्ही किती रक्त सांडणार आहात? आमची लोकसंख्या १४० कोटी आहे," असं समिक भट्टाचार्य म्हणाले.

"काही देश शस्त्रे विकण्यासाठी त्यांची भूमिका बदलतात आणि आम्हाला संवाद साधण्याचा सल्ला देतात. ते म्हणतात की सर्व काही संवादाने सोडवता येते, परंतु त्यांचा हेतू काहीतरी वेगळाच आहे. पण आज संपूर्ण जग 'मोदी-मोदी'चा जयजयकार करत आहे कारण पंतप्रधान मोदी हे दहशतवादाच्या विरुद्धच्या लढाईचे प्रतीक बनले आहेत," असेही भट्टाचार्य म्हणाले.

नाव न घेता इंग्लंडलाही सुनावलं

इंग्लंडचे नाव न घेता त्यांनी संपत्ती लुटल्याचे भट्टाचार्य म्हणाले. "भारत गरीब नाही. अनेक लोकांनी आपल्याला लुटले आहे आणि त्यांचे भव्य महाल बांधले आहेत. तुम्ही आणखी किती लुटणार?" असं भट्टाचार्य म्हणाले.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPakistanपाकिस्तानLondonलंडनBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी