शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील मराठी शाळांना महाराष्ट्र सरकारतर्फे अभ्यासक्रम पुरवणार; आशिष शेलारांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 11:00 IST

Ashish Shelar News: अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या आशिष शेलार यांनी सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

Ashish Shelar News: अमेरिकेतील मराठीशाळांना महाराष्ट्र शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, असे आश्वासन राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी दिले. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या आशिष शेलार यांनी  कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को येथील बे एरिया येथे मराठीशाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. 

सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकवून "मराठीचा संस्कार" आपल्या नव्या पिढीवर व्हावा म्हणून इथे शाळा चालवतात. सन २००५ पासून ही शाळा चालवली जाते. सुमारे ३०० विद्यार्थी इथे मराठी शिकत आहेत. अमेरिकेत अशा ५० हून अधिक शाळा या मराठीच्या असून काही सेवा भाव ठेवून इथली मराठी माणसे या शाळा चालवत आहेत.

अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने शिफारस केली तसेच अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला तर  मराठी भाषा शिकवणे, परिक्षा व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना देणे सुलभ होईल, असे या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी या भेटीत लक्षात आणून दिले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांच्याशी चर्चा करुन महाराष्ट्र शासनाचे आवश्यक ते सहकार्य व शिफारस, अभ्यासक्रम नक्की देईल, असे आश्वासन मंत्री शेलार यांनी अमेरिकेतील  महाराष्ट्र मंडळाला दिले आहे.

 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारAmericaअमेरिकाmarathiमराठीSchoolशाळाBJPभाजपाPoliticsराजकारण