लादेनच्या जावयाला जन्मठेप

By Admin | Updated: September 25, 2014 03:09 IST2014-09-25T03:09:51+5:302014-09-25T03:09:51+5:30

घैत हा अल-काईदाचा प्रवक्ताही होता. ९/११ रोजीच्या भयानक हल्ल्यानंतर तो एका व्हिडिओ फितीत ओसामा बिन लादेनच्या शेजारी बसल्याचे दिसला होता.

Bin Laden's life imprisonment | लादेनच्या जावयाला जन्मठेप

लादेनच्या जावयाला जन्मठेप

न्यूयॉर्क : जगभरात दहशत निर्माण करणाऱ्या अल-काईदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा जावई सुलेमान अबू घैत याला अमेरिकन नागरिकाच्या हत्येचा कट रचणे आणि दहशतवाद्यांना साहित्य पुरविण्याच्या आरोपावरून अमेरिकन कोर्टाने जन्मठेप सुनावली.
घैत हा अल-काईदाचा प्रवक्ताही होता. ९/११ रोजीच्या भयानक हल्ल्यानंतर तो एका व्हिडिओ फितीत ओसामा बिन लादेनच्या शेजारी बसल्याचे दिसला होता. त्याला मागच्या वर्षी फेब्रुवारीत जेरबंद करण्यात आले होते. तीन आठवडे खटला चालविल्यानंतर यावर्षी त्याला दोषी ठरविण्यात आले होते. मॅनहटन फेडरल कोर्टाचे न्यायाधीश लेविस कॅप्लान यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. (वृत्तसंस्था)




 

Web Title: Bin Laden's life imprisonment