बिल गेट्स यांनी दिला मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2020 10:09 AM2020-03-14T10:09:04+5:302020-03-14T10:42:28+5:30

बिल गेट्स यांनी 1975 मध्ये पॉल एलन यांच्यासोबत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. 2000 पर्यंत गेट्स कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राहिले होते. यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. 

Bill Gates resigns Microsoft's board of directors hrb | बिल गेट्स यांनी दिला मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा

बिल गेट्स यांनी दिला मायक्रोसॉफ्टच्या संचालक मंडळाचा राजीनामा

googlenewsNext

वॉशिंग्टन:  मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि सल्लागार बिल गेट्स यांनी कंपनीच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. यामागचे कारण कंपनीने गेट्स यांना सामाजिक कार्यांसाठी वेळ मिळावा म्हणून दिल्याचे सांगितले आहे. असे असले तरीही गेट्स हे कंपनीचे सीईओ सत्या नडेला आणि अन्य अधिकाऱ्यांचे सल्लागार राहणार आहेत. 



मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी अध्यक्ष सत्या नडेला यांनी सांगितले की, गेट्स यांच्यासोबत काम करणे खूप आनंदाचे आणि सन्मानाचे राहिले आहे. त्यांच्यासोबत खूप वर्षे काम केले आहे आणि शिकलो आहे. गेट्स यांनी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी कंपनीची स्थापना केली होती. 


गेट्स यांनी 1975 मध्ये पॉल एलन यांच्यासोबत मायक्रोसॉफ्टची स्थापना केली होती. 2000 पर्यंत गेट्स कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष राहिले होते. यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी 2008 मध्ये समाजसेवेसाठी बिल एंड मेलिंडा गेट्स फाउंडेशनची स्थापना केली होती. या संस्थेला त्यांनी आयुष्यभराची कमाई दान केली होती. गेट्स हे 2014 पासून संचालक मंडळाच्या अध्यक्षपदावर कार्यरत होते.

Web Title: Bill Gates resigns Microsoft's board of directors hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.