Tahawwur Rana Extradition: मुंबईदहशतवादी हल्ल्यातील (2008) दोषी तहव्वुर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी मंजूरी दिली. भारत प्रदीर्घकाळापासून तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणासंदर्भात पाठपुरावा करत होता. राणा हा मुळचा पाकिस्तानी असून कॅनडाचा नागरिक आहे.
कनिष्ठ न्यायालयात कायदेशीर लढाई हरल्यानंतर, राणाने भारताला प्रत्यार्पण करण्याविरुद्ध अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
राणाकडे ही शेवटी संधी होती -कनिष्ठ न्यायालये आणि अनेक संघीय न्यायालयांमध्ये कायदेशीर लढाई हरल्यानंतर, राणाने सॅन फ्रान्सिस्कोमधील नॉर्दर्न सर्किटसाठी यूएस कोर्ट ऑफ अपीलमध्ये अर्ज केला होता. भारताकडे प्रत्यार्पण होऊ नये, यासाठी अपील करण्याची राणाकडे ही शेवटची कायदेशीर संधी होती.
तहव्वुर राणावर आहेत गंभीर आरोप -महत्वाचे म्हणजे, तहव्वुर राणावर डेव्हिड हेडलीला मदत केल्याचे गंभीर आरोप आहेत. डेव्हिड कोलमन हेडली हा २६/११ च्या मुंबईदहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड होता. राणाने हेडलीला मुंबईतील ठिकाणांची रेकी करण्यास मदत केली होती. यासंदर्भात भारताने अमेरिकन न्यायालयात भक्कम पुरावेही सादर केले होते.
राणाला २००९ मध्ये शिकागो येथून करण्यात आली होती अटक -राणाला २००९ मध्ये शिकागो येथून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाशी संबंध असल्याचाही आरोप आहे. याशिवाय, तो पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा कार्यकर्ता असल्याचेही म्हटले गेले आहे.
६ अमेरिकन नागरिकांसह एकूण १६६ जणांचा मृत्यू झाला होता -या दहशतवादी हल्ल्यात ६ अमेरिकन नागरिकांसह एकूण १६६ जणांचा मृत्यू झाला होता. १० पाकिस्तानी दहशतवाद्यांनी ६० तासांहून अधिक काळ मुंबई वेठीस धरली होती.