शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! होर्मुजच्या खाडीत युद्धनौका पाठविणार; इराणच्या विरोधात ब्रिटन, जपानसह ६ देश एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 08:20 IST

Strait of Hormuz blockade: इराणच्या हल्ल्यांमुळे होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक ठप्प. ब्रिटन, जपान आणि युरोपियन देशांचा इराणला इशारा. जागतिक इंधन पुरवठा धोक्यात. वाचा सविस्तर.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानली जाणारी 'होर्मुजची सामुद्रधुनी' सध्या मृत्यूचा सापळा बनली आहे. इराणने व्यापारी जहाजांवर ड्रोन आणि स्फोटक बोटींनी हल्ले सुरू केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. या पार्श्वभूमीवर ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड आणि जपान या सहा प्रमुख देशांनी संयुक्त निवेदन जारी करून इराणला कडक इशारा दिला आहे.

होर्मुज सामुद्रधुनीतून जगातील कच्च्या तेलाचा आणि एलपीजीचा मोठा पुरवठा होतो. इराणच्या हल्ल्यांमुळे शेकडो जहाजे या मार्गाबाहेर अडकून पडली आहेत. याचा थेट परिणाम भारत, जपान आणि युरोपातील इंधन पुरवठ्यावर झाला आहे. या सहा देशांनी स्पष्ट केले आहे की, ऊर्जा पुरवठा साखळीतील हा अडथळा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी थेट धोका आहे.

कतारच्या नुकसानीचा जागतिक फटकारॉयटर्सच्या वृत्तानुसार, या देशांनी कतार आणि सौदी अरेबियातील तेल व गॅस प्रकल्पांवरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. 'कतार एनर्जी'ने आधीच स्पष्ट केले आहे की, त्यांच्या १७% एलएनजी निर्यात क्षमतेवर परिणाम झाला असून वार्षिक २० अब्ज डॉलर्सचा फटका बसणार आहे. या नुकसानीमुळे जागतिक बाजारात गॅसचे दर गगनाला भिडण्याची भीती निर्माण झाली आहे.

सामुद्रिक सुरक्षेसाठी लष्करी सज्जता?संयुक्त निवेदनात या देशांनी म्हटले आहे की, ते या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून जहाजांची सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी 'समन्वित प्रयत्न' करण्यास तयार आहेत. याचा अर्थ असा लावला जात आहे की, आता हे देश आपली युद्धनौका होर्मुजमध्ये इराणच्या विरोधात तैनात करू शकतात. "इराणच्या या कृत्याचा परिणाम जगाच्या प्रत्येक कोपऱ्यातील माणसावर, विशेषतः गरीब वर्गावर होईल," असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

प्रभावित देशांशी एकजुटतायुरोपियन कौन्सिलने इराणच्या हल्ल्यांचा बळी ठरलेल्या आखाती देशांशी (जसे की बहरीन, कुवेत, कतार, सौदी अरेबिया) आपली एकजुटता व्यक्त केली आहे. "प्रादेशिक शांतता आणि स्थिरता धोक्यात आणणाऱ्या कोणत्याही कृतीचे समर्थन केले जाणार नाही," असे युरोपियन नेत्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मधील जहाजांची वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र येण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी जपानलाही सुनावलेमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, इराण हे संपूर्ण जगासाठी, विशेषतः मध्यपूर्वेसाठी एक मोठे संकट आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेने योग्य वेळी उचललेले पाऊल जगाला सुरक्षित करेल. यावेळी त्यांनी जपानसारख्या देशांना खडे बोल सुनावले. ट्रम्प म्हणाले, "जपानच्या तेल आयातीचा ९०% हिस्सा ज्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' मधून येतो, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आता जपानने स्वतः घेतली पाहिजे. अमेरिका एकटा किती काळ सर्वांचे रक्षण करणार?"

English
हिंदी सारांश
Web Title : Six Nations Unite Against Iran, Deploying Warships to Hormuz Strait

Web Summary : Amid escalating tensions, six nations, including Britain and Japan, are poised to deploy warships to the Strait of Hormuz after Iran's attacks on shipping. This disruption threatens global energy supplies, impacting India, Japan, and Europe, prompting warnings of international security risks.
टॅग्स :IranइराणUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरWarयुद्धJapanजपानFranceफ्रान्सLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईFuel Crisisइंधन टंचाई