शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! भारताची दोन जहाजे LPG घेऊन होर्मुझबाहेर पडणार; पाकिस्तानचे तेलवाहू जहाज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 10:07 IST

Strait of Hormuz Marathi News: होरमुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे भारताचे २२ तेल आणि गॅस जहाजे अडकली आहेत. इराण-इस्रायल वादामुळे भारताच्या इंधन पुरवठ्यावर काय परिणाम होईल? पाहा सविस्तर बातमी.

जगातील तेलाच्या व्यापाराचा 'कणा' समजली जाणारी 'होरमुझची सामुद्रधुनी' सध्या रणांगण बनली आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील वाढत्या तणावामुळे इराणने हा मार्ग रोखून धरला असून, याचा थेट फटका भारताला बसण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत या अरुंद सागरी मार्गातून एकही मोठे तेलवाहू जहाज बाहेर पडलेले नाही, ज्यामुळे जागतिक इंधन बाजारात खळबळ माजली आहे. अशातच शारजाहच्या समुद्रकिनाऱ्यावर थांबून असलेली भारताची दोन जहाजे आज होर्मुझबाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

भारताची तेल आणि वायूची गरज मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. सध्या भारताची २२ जहाजे आखाती देशांमध्ये अडकून पडली आहेत. यामध्ये 'इंडियन ऑइल'ने (IOC) भाड्याने घेतलेले 'पाइन गॅस' आणि BPCL ने घेतलेले 'जग वसंत' ही दोन महत्त्वाची LPG जहाजे आहेत. ही जहाजे सध्या युएईच्या शारजाहजवळ नांगर टाकून उभी आहेत. जर हा पुरवठा वेळेवर झाला नाही, तर भारतात स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा जाणवू शकतो.

या गंभीर परिस्थितीत भारत सरकारने कूटनीतिक हालचाली वेगवान केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जागतिक नेत्यांच्या संपर्कात असून, भारतीय जहाजांना सुरक्षित रस्ता मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात इराणने भारताची दोन गॅस जहाजे सोडून दिलासा दिला होता. इराणसोबत असलेल्या जुन्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भारताला या संकटातून मार्ग निघण्याची आशा आहे.

पाकिस्तानला रस्ता, भारताला प्रतीक्षा?एकीकडे भारतीय जहाजे अडकलेली असताना, पाकिस्तानचे एक तेलवाहू जहाज या मार्गातून सुखरूप बाहेर पडल्याची माहिती समोर आली आहे. इराण 'निवडक' देशांना रस्ता देऊन जगावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

काय होईल परिणाम?जगातील २० टक्के तेल याच मार्गातून जाते. हा मार्ग पूर्णपणे बंद झाल्यास इंधनाचे दर गगनाला भिडतील, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Indian LPG Ships to Exit Hormuz Amidst Tensions: Details Here

Web Summary : Amidst Iran-Israel tensions disrupting Hormuz Strait, two Indian LPG ships are set to depart. While Indian ships face delays, a Pakistani vessel passed through, raising concerns. The crisis threatens global fuel prices and India's gas supply.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईUS Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरFuel Crisisइंधन टंचाईIranइराणWarयुद्ध