तेहरान: इराणमधील सत्तेच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात मारले गेलेले अयातुल्ला अली खामेनेई यांचे ज्येष्ठ पुत्र आणि प्रभावी धर्मगुरू मुजतबा हुसेनी खामेनेई यांची इराणचे पुढील 'सर्वोच्च नेते' म्हणून निवड करण्यात आली आहे. 'इराण इंटरनॅशनल'ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणच्या शक्तिशाली रिव्होल्युशनरी गार्ड्सने (IRGC) दबाव टाकून ही निवड घडवून आणली आहे.
दबावाखाली निवड: मुजतबा यांची निवड ही नैसर्गिक प्रक्रियेपेक्षा लष्करी आणि राजकीय दबावाचा परिणाम असल्याचे मानले जात आहे. रिव्होल्युशनरी गार्ड्सने मुजतबा यांच्या नावासाठी आग्रह धरला होता, जेणेकरून युद्धकाळात सत्तेवर आपली पकड मजबूत ठेवता येईल. आज इराण अमेरिकेकडे चर्चेचा प्रस्ताव पाठविण्याती शक्यता आहे.
राजकीय वारसामुजतबा खामेनेई हे गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यामागून इराणचे राजकारण सांभाळत होते. ते आपल्या वडिलांच्या अत्यंत विश्वासू सल्लागारांपैकी एक मानले जातात. अमेरिका आणि इस्रायलसोबत सुरू असलेल्या भीषण युद्धाच्या दरम्यान ही नियुक्ती झाली आहे. मुजतबा यांची भूमिका आता इराणच्या पुढील लष्करी धोरणांसाठी अत्यंत निर्णायक ठरेल.
आंतरराष्ट्रीय पडसादअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच संकेत दिले होते की, इराणने आपल्या देशाच्या आतूनच कोणातरी नवीन नेत्याची निवड करावी. आता मुजतबा यांच्या निवडीनंतर अमेरिका आणि इस्रायल आपली रणनीती बदलणार का, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Mojtaba Khamenei, son of Ayatollah Ali Khamenei, is Iran's new Supreme Leader. IRGC pressure influenced the selection during the ongoing conflict with the US and Israel, potentially reshaping Iran's military strategy.
Web Summary : अयातुल्ला अली खमेनेई के बेटे मुजतबा खमेनेई ईरान के नए सर्वोच्च नेता बने। आईआरजीसी के दबाव से चुनाव हुआ, अमेरिका और इजरायल के साथ चल रहे संघर्ष के बीच ईरान की सैन्य रणनीति बदल सकती है।