Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 18:15 IST2025-07-30T18:08:37+5:302025-07-30T18:15:12+5:30

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

Big news Donald Trump imposes 25% tax on India, effective from August 1 also imposes fine | Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला

Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर लादण्याची घोषणा केली आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय १ ऑगस्टपासून लागू होणार आहे. बुधवारी त्यांनी ट्रुथ या सोशल प्लॅटफॉर्मवर याची घोषणा केली. "अमेरिका १ ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर अतिरिक्त २५ टक्के कर लादेल", असं ते म्हणाले. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर दंड लावण्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली आहे.

भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या

"मित्र असूनही, भारत आणि अमेरिकेत फारसा व्यापार झाला नाही. "लक्षात ठेवा, भारत आमचा मित्र आहे, परंतु गेल्या काही वर्षांत आम्ही त्यांच्याशी तुलनेने कमी व्यापार केला आहे. कारण ते खूप जास्त शुल्क लादतात. जगातील कोणत्याही देशापेक्षा भारतात सर्वात कठीण व्यापार अडथळे आहेत", असंही ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. 

रशियासोबतचा व्यापार भारतासाठी महागात पडला

गेल्या ३ वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, यामुळे युरोपीय देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले. युरोपीय देश रशियाकडून कच्चे तेल आणि वायू आयात करत नाहीत. यामुळे, भारत गेल्या अनेक वर्षांपासून रशियाकडून स्वस्त कच्चे तेल खरेदी करत आहे, हे अमेरिका आणि युरोपच्या डोळ्यात खुपत आहे. यामुळे, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारतावर २५ टक्के शुल्क आणि दंड लादला आहे.

Web Title: Big news Donald Trump imposes 25% tax on India, effective from August 1 also imposes fine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.