शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

इराणच्या न्यूक्लिअर साईट्सवर मोठा सायबर हल्ला! अनुचित घटनेच्या भीतीने जग भयभीत झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 14:20 IST

इराणची न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यासह इराणच्या जवळपास सर्व सरकारी दलांना सायबर हल्ले आणि माहिती चोरीचा सामना करावा लागला आहे.

गेल्या काही दिवसापासून इराण आणि इस्त्रायमध्ये तणाव सुरू झाला आहे.या दरम्यान, आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. शनिवारी इराणच्या न्यूक्लिअर साईट्ससह अनेक ऑफिसवर एकाच वेळी सायबर हल्ले झाले. या सायबर हल्ल्यांमुळे इराण सरकारच्या जवळपास सर्व सेवा विस्कळीत झाल्या आहेत. इराणवर प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्याच्या दिशेने इस्रायलचे हे पहिले पाऊल असल्याचे बोलले जात आहे.

इराणच्या अणु केंद्रांनाही सायबर हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा १ ऑक्टोबर रोजी इस्रायलने प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, आता ही घटना घडली आहे.

उत्तर गाझा पट्टीच्या जबलियामध्ये इस्रायलने पुन्हा हल्ला केला, २० हून अधिक लोक ठार

इराणच्या सर्वोच्च सायबर सुरक्षा परिषदेचे माजी सचिव फिरोजाबादी यांनी जाहीर केले की, न्यायव्यवस्था, विधिमंडळ आणि कार्यपालिका यासह इराणच्या जवळपास सर्व सरकारी यंत्रणांवर सायबर हल्ले आणि माहिती चोरीचा सामना करावा लागला आहे.

इराणच्या सर्वोच्च सायबर सुरक्षा परिषदेचे माजी सचिव फिरोजाबादी म्हणाले, "इराण सरकारच्या जवळपास प्रत्येक क्षेत्राला - न्यायपालिका, कायदेमंडळ आणि कार्यकारी - या सायबर हल्ल्यांमुळे प्रभावित झाले आहे. महत्त्वाची माहितीची मी चोरी झाली आहे.

"आमच्या अणु प्रकल्पांवर तसेच इंधन वितरण, नगरपालिका सेवा, वाहतूक आणि बंदरे यासारख्या गंभीर नेटवर्कवरही सायबर हल्ला झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला नक्कीच प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी बुधवारी दिला होते. ते म्हणाले होते की, बदला “घातक” आणि “आश्चर्यजनक” असेल. उत्तर गाझा नंतर इस्रायलने आता लेबनॉनमध्ये हिजबुल्लाहच्या फायटरवर जमिनीवर हल्ला चढवला आहे.

१ ऑक्टोबर रोजी इराणने इस्रायलवर हल्ला केला आणि त्यानंतर इस्रायलने इराणला चोख प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली. इस्रायलने इराणवर थेट हल्ला केल्याने मध्यपूर्वेत महायुद्ध सुरू होऊ शकते, पण मोठी गोष्ट म्हणजे इराणच्या हल्ल्याला इतके दिवस उलटूनही इस्रायल केवळ धमक्या देत आहे . पण इस्त्रायल आणि इराणमधील तणावामुळे पूर्ण जग भयभीत झाले आहे.

टॅग्स :IranइराणIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्ध