ललित मोदीला मोठा धक्का, वनुआतुच्या पंतप्रधानांनी दिले पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 11:38 IST2025-03-10T11:37:36+5:302025-03-10T11:38:00+5:30

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी याला वनुआतु सरकारने मोठा धक्का दिला आहे.

Big blow to Lalit Modi Vanuatu Prime Minister orders cancellation of passport | ललित मोदीला मोठा धक्का, वनुआतुच्या पंतप्रधानांनी दिले पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश

ललित मोदीला मोठा धक्का, वनुआतुच्या पंतप्रधानांनी दिले पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी याला आता पुन्हा एक झटका बसला आहे. वनुआतु या बेट देशामध्ये स्थायिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ललित मोदी याला तेथील सरकारने मोठा धक्का दिला आहे. ललित मोदी याला जारी केलेला वनुआतु पासपोर्ट रद्द करण्याचे निर्देश वनुआतुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी नागरिकत्व आयोगाला दिले आहेत.

भीषण! 'या' देशात पावसाचा प्रकोप; फक्त ८ तासांत पडला वर्षभराचा पाऊस, १६ जणांचा मृत्यू

काही दिवसापू्र्वीच ललित मोदी याने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला होता. ललित मोदी २०१० मध्ये भारत सोडून लंडनमध्ये स्थायिक झाला. शुक्रवारी, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की ललित मोदी याने त्याचे भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले होते की, "ललित मोदी याने लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात त्यांचा पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केला आहे. सध्याच्या नियमांनुसार आणि प्रक्रियेनुसार त्याची तपासणी केली जाईल. याने वनुआतुचे नागरिकत्व मिळवले आहे. आम्ही कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध खटला चालवत आहोत, असंही ते म्हणाले होते.

हा देश फरार असलेल्यांना आश्रय देतो

वनुआतुमध्ये एक टॅक्स हेवन देश आहे, तिथे नागरिकत्व मिळविण्यासाठी १.३ कोटी रुपये गुंतवावे लागतात. जर पती-पत्नी दोघेही नागरिकत्व घेतात तर संयुक्त गुंतवणुकीच्या रकमेवर मोठी सूट मिळते. हा देश फरार असणाऱ्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानला जातो.

आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये काही दिवसापूर्वीच उघड झालेल्या खुलाशानंतर, वनुआतुचे पंतप्रधान जोथम नपत यांनी देशाच्या नागरिकत्व आयोगाला ललित मोदी याला जारी केलेला पासपोर्ट रद्द करण्याची विनंती केली आहे. "त्यांच्या अर्जादरम्यान, त्यांनी इंटरपोल तपासणीसह सर्व मानक पार्श्वभूमी तपासणी उत्तीर्ण केल्या," असे पंतप्रधान नपथ म्हणाले.

Web Title: Big blow to Lalit Modi Vanuatu Prime Minister orders cancellation of passport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.