शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

#BestOf2017: महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे वर्ष 

By अोंकार करंबेळकर | Published: December 23, 2017 2:28 PM

२०१७ हे वर्ष जगातील विविध महत्त्वाच्या निर्णयांना जन्म देणारे वर्ष म्हणून ओळखले जाईल. सध्या अस्तित्त्वात असलेल्या काही देशांचा नकाशाही भविष्यात या वर्षात घडलेल्या काही घडामोडींमुळे बदलण्याची शक्यता आहे.

मुंबई - २०१७ हे वर्ष जगातील विविध महत्त्वाच्या निर्णयांना जन्म देणारे वर्ष म्हणून ओळखले जाईल. सध्या अस्तित्त्वात असलेल्या काही देशांचा नकाशाही भविष्यात या वर्षात घडलेल्या काही घडामोडींमुळे बदलण्याची शक्यता आहे. २०१७ मधील अशाच काही घटनांचा आढावा आपण घेणार आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांची निवड आणि बदलती समीकरणे -२०१७ हे वर्षच मुळी जन्मले ते अमेरिकेतील नव्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडीने. अमेरिकेत बराक ओबामा यांच्या जागी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड अमेरिकन जनतेने केली आणि त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. २१ जानेवारी रोजी ट्रम्प यांनी पदभार स्वीकारुन कार्यकाळास प्रारंभ केला. सहा देशांतील स्थलांतरितांवर थेट बंदी घालून त्यांनी पुढे अमेरिका स्थलांतरितांबाबत किती कठोर भूमिका घेऊ शकते याचे संकेतच त्यांनी दिले. त्यानंतर एका महिन्यात म्हणजे २१ फेब्रुवारी रोजी उत्तर कोरियाने जपान समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करुन पुन्हा नवा गोंधळ निर्माण केला. उत्तर कोरियाने या वर्षभरात अण्वस्त्र आणि इतर क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेऊन सतत वातावरण तापवत ठेवले तर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनीही किम जोंग उन यांच्याविरोधात थेट वक्तव्ये करत त्याला उत्तर दिले. वर्षभरात अमेरिका आणि उत्तर कोरिया यांचे उत्तर प्रत्युत्तर देणे चालूच राहिले. संयुक्त राष्ट्राने बंधने घालूनही उत्तर कोरियाच्या भूमिकेत तसूभरही बदल झाला नाही.

उत्तर कोरियाची क्षेपणास्त्र चाचणी आणि तणाव -२१ फेब्रुवारी रोजी उत्तर कोरियाने जपान समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करुन पुन्हा नवा गोंधळ निर्माण केला. उत्तर कोरियाने या वर्षभरात अण्वस्त्र आणि इतर क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेऊन सतत वातावरण तापवत ठेवले तर अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनीही किम जोंग उन यांच्याविरोधात थेट वक्तव्ये करत त्याला उत्तर दिले. वर्षभरात अमेरिका आणि उत्तर कोरिया यांचे उत्तर प्रत्युत्तर देणे चालूच राहिले. संयुक्त राष्ट्राने बंधने घालूनही उत्तर कोरियाच्या भूमिकेत तसूभरही बदल झाला नाही. तसेच डोनल्ड ट्र्म्प यांनी जपान आणि दक्षिण कोरियाला दिलेल्या फेटीवेळेसही उत्तर कोरियाविरोधात उघड विधाने केली त्यालाही किम जोग उन यांच्या प्रशासनाने प्रत्युत्तर दिले. 

येमेनवर कुपोषणाचे संकट -१० मार्च रोजी संयुक्त राष्ट्राने येमेन, सोमालिया येथिल कुपोषण व दुष्काळाबाबत चिंता व्यक्त केली. येमेन सध्या कुपोषणाच्या भीषण समस्येला तोंड देत आहे. २२मे रोजी इंग्लंडमध्ये मँचेस्टर शहरात एका सांगितिक कार्यक्रमात झालेल्या हल्ल्यात २२ लोकांचे प्राण गेले व १०० लोक जखमी झाले. 

हवामान करारातून अमेरिकेची माघार -१ जून रोजी पँरिस हवानान करारातून अमेरिकेने माघार घेऊन सर्व जगाला धक्का दिला. ७ जून रोजी इराणच्या संसदेवर आणि खोमेनी यांच्या स्मृतीस्थळावर झालेल्या हल्ल्यात १७ जणांचे प्राण गेले. गेली सहा ते सात वर्षे आयसीसच्या तावडीत असणारे इराकमधील मोसूल शहर १० जुलै रोजी मुक्त झाले. तर १७ आँक्टोबर रोजी राक्का शहर आयसीसच्या तावडीतून मुक्त झाले.

रोहिंग्यांचा प्रश्न भडकला, म्यानमारवर सर्व जगाची टीका -जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून म्यानमारच्या रखाइन प्रांतातील रोहिंग्यांनी जीव मुठीत धरुन बांगलादेशच्या दिशेने पलायन सुरु केले. साधारणत: ८ लाख रोहिंग्या सध्या बांगलादेशात आश्रय छावणीत राहात आहेत. त्यांना परत घ्यावे यासाठी म्यानमारवर सर्व बाजूंनी दबाव टाकण्यात आला. त्याचप्रमाणे म्यानमारच्या स्टेट कौन्सीलर आंग सान सू की यांच्यावर टीकाही झाली. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना वाजेद यांनी याबाबत संयुक्त राष्ट्रात वक्तव्य केले तर आंग सान यांनी आमसभेला जाणेच टाळले. २५ ते ३० आँगस्ट रोजी अमेरिकेला हार्वे चक्रीवादळाने तडाखा दिला. तर १९ सप्टेंबर रोजी मेक्सीको भूकंपाने हादरला. 

कुर्दिस्तान आणि कँटलोनियाचे स्वातंत्र्यासाठी प्रयत्न -२५ सप्टेंबर रोजी इराकच्या कुर्दांनी स्वतंत्र कुर्दिस्तानासाठी मतदान घेतले. या मतदानाला इराक, सीरिया यांनी विरोध केला होता. १४ आँक्टोबररोजी सोमालियातील मोगादिशूमध्ये झालेल्या हल्ल्यात ५१२ लोकांचे प्राण गेले. २७ आँक्टोबर रोजी स्पेनच्या कँटलोनिया प्रांताने स्वत:ला स्वतंत्र घोषित केले.१२ नोव्हेंबर रोजी इराणमध्ये आलेल्या भूकंपात ५३० लोकांचे प्राण गेले.

मुगबे यांची स्थानबद्धता व सत्तांतर -१५ नोव्हेंबर हा दिवस झिम्बाब्वेसाठी राजकारणाचा दिशा बदलणारा दिवस म्हणून ओळखला जाईल.  सलग ३७ वर्षे या देशाचे नेतृत्त्व करणारे राँबर्ट मुगाबे यांना या दिवशी पदच्युत करण्यात आले.  २४ नोव्हेंबर रोजी इजिप्तच्या  सिनाईमधील मशिदीवर झालेल्या हल्ल्यात ३०५ लोकांचे प्राण गेले.

मध्यपुर्वेत काय घडले ? -संपूर्ण जगाचे लक्ष ज्या शहरावर असते अशा जेरुसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याचा निर्णय ६ डिसेंबर रोजी ट्रम्प प्रशासनाने घेतला. त्यांच्या या निर्णयावर जगभरातून टीका व विरोध झाला. पँलेस्टाइन अथोरिटी आणि अरब राष्ट्रांनी याचा कडाडून विरोध केला. दोन दिवसांपुर्वी संयुक्त राष्ट्रात बहुतेक देशांनी या प्रस्तावाला विरोध केला. इस्रायली सरकारने मात्र ट्रम्प यांच्या निर्णयाचे अपेक्षेप्रमाणेच जोरदार स्वागत केले. 

सौदी अरेबियाच्या भूमिकेकडे जगाचे लक्ष -याच वर्षी सौदी अरेबियासह अनेक अरब देशांनी कतारशी संबंध तोडण्याची घटना घडली. या देशांनी आपल्या राजदुतांना माघारी बोलावून कतारवर बहिष्कार घातला. लेबनाँनच्या सरकारमध्ये हिजबोल्लाचे लोक घुसले आहेत असा आरोप करत सौदीने लेबनाँनशीही संपर्क तोडला होता. सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील काही राजपुत्रांना भ्रष्टाताराच्या आरोपाखाली तुरुंगातही जावे लागले तर सौदीने काही पुरोगामी निर्णयही घेऊन जगाला धक्का दिला. महिलांना गाडी चालवण्यास आणि सिनेमागृहे देशात सुरु करण्याची मोकळीक याच वर्षी मिळाली आहे. सौदीच्या राजांनी रशिया आणि इंडोनेशियालाही या वर्षी भेट दिली आहे.

नोबेलची घोषणा- यावर्षी रसायनशास्त्रात जँक्स ड्युबोशे, जोआकिम फ्रँक, रिचर्ड हेंडरसन यांना, अर्थशास्त्रात रिचर्ड थेलर यांना, साहित्यात कोझुओ इशिमुरो यांना, अण्वस्त्राविरोधात काम करणार्या संघटनेला शांतततेचे नोबेल, बँरी बँरिश, किप थाँर्न, रेइनर वाइने यांना पदारिथविज्ञानाचे तर आरोग्य औषधशास्त्राचे नोबेल जेफ्री सी हाँल, यंग यांना मिळाले.

संयुक्त राष्ट्रात भारत -२०१७ साली पोर्तुगीज मुत्सद्दी अँटोनियो ग्युटर्स यांची संयुक्त राष्ट्राच्या सरचिटणीसपदी निवड झाली. भारताने या वर्षात संयुक्त राष्ट्रात काही महत्त्वाच्या निवडणुका जिंकल्या. आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताच्या दलवीर भंडारी यांनी सलग दुसर्यांदा स्थान मिळवले. भंडारी यांनी इंग्लंडच्या ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांना पराभूत केले. तर इंटरनँशनल ट्रायब्युनल फाँर द लाँ अँड सी या न्यायालयात पहिल्या भारतीय महिला न्यायाधीश होण्याचा सन्मान डाँ. नीरु चढ्ढा यांनी मिळवला. काश्मीचा मुद्दा पाकिस्तानने सलग दुसर्यांदा आमसभेत काढला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खान अब्बासी आणि परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी भारताविरोधात बेछूट आरोप करण्याचा प्रयत्न आमसभेत केला मात्र भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि भारतीय मुत्सद्द्यांनी योग्य प्रत्युत्तर देत पाकिस्तानला एकाकी पाडले.

 

टॅग्स :Best of 2017बेस्ट ऑफ 2017Internationalआंतरराष्ट्रीय