फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 21:13 IST2025-09-26T21:13:06+5:302025-09-26T21:13:45+5:30
Netanyahu Speech UNGA delegation walk out: पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीत अजूनही इस्रायलचे हल्ले सुरूच

फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
Netanyahu Speech UNGA delegation walk out : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. पॅलेस्टाईन आणि गाझापट्टीत इस्रायल सातत्याने हल्ले करत असून, त्यात अनेक निरपराध नागरिक मृत्यूमुखी पडल्याचा दावा अहवालांमध्ये करण्यात आला आहे. माणुसकीच्या नात्याने इस्रायलने युद्ध थांबवावे असे विविध देशांकडून सांगण्यात आले आहे. पण इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी हमासवर हल्ले थांबणार नाहीत असे स्पष्ट केले आहेत. त्यामुळे नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील इस्रायल सरकारवर जगातील अनेक देश नाराज आहेत. हीच नाराजी आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) दिसून आली. बेंजामिन नेतन्याहू व्यासपीठावर भाषणासाठी आले त्यावेळी अनेक देशांचे प्रतिनिधी सभात्याग करून बाहेर जाताना दिसले.
Attendees of the UN General Assembly stage a mass walkout as Israeli Prime Minister Benjamin Netanyahu enters the hall for his address. pic.twitter.com/amZiL1W45g
— The National (@TheNationalNews) September 26, 2025
सभागृहात खुर्च्या रिकाम्या
संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत जागतिक नेत्यांनी गाझा युद्धाच्या बाबतीत इस्रायलच्या भूमिकेवर आज जोरदार टीका केली. या टीकेनंतर बेंजामिन नेतन्याहू हे भाषणासाठी उठले. पण अनेक देशांचे प्रतिनिधी त्यांच्या भाषणापूर्वीच उठून निघून गेल्यामुळे महासभेचे सभागृह जवळजवळ रिकामे होते.
इस्रायली प्रतिनिधी मंडळाकडून टाळ्यांचा कडकडाट
इस्रायली प्रतिनिधी मंडळाने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाह सदस्यांचे शेकडो पेजर उडवून दिल्याचे वृत्त दिले, तेव्हा त्यांना जोरदार टाळ्या मिळाल्या. सीएनएनने वृत्त दिले की या स्फोटांमध्ये काही मुलांसह किमान ३७ लोकांचा मृत्यू झाला. लेबनॉनच्या आरोग्य विभागाने सांगितले की सुमारे ३,००० लोक जखमी झाले. पण इस्रायलने याकडे वेगळ्या भूमिकेतून पाहिल्याचे सांगितले.
BREAKING: Benjamin Netanyahu has announced that, thanks to Israeli intelligence, this speech is now live on every cellphone in Gaza:
— Vivid.🇮🇱 (@VividProwess) September 26, 2025
“Lay down your arms, free all 48 hostages. If you do, you will live. If you don’t, Israel will hunt you down.”
pic.twitter.com/PpGLOpjH1v
हमासवरील कारवाई अद्याप पूर्ण झालेली नाही !
नेतन्याहू म्हणाले की हमासची ताकद कमी झाली असली तरी ते अजूनही एक धोका आहेत. ते म्हणाले की, आमच्या नागरिकांच्या ताकदीमुळे, आमच्या सैनिकांच्या शौर्यामुळे आणि आमच्या धाडसी निर्णयांमुळे इस्रायल सर्वात काळ्या दिवसांतून बाहेर पडला आहे आणि मोठ्या लष्करी कारवायाही करू शकला आहे. परंतु हमासवरील कारवाई अद्याप पूर्ण झालेली नाही.
दरम्यान, सोमवारी नेतन्याहू अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत.