शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

जगातील सगळ्यात मोठे विमानतळ बीजिंगमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:28 AM

जगातील सगळ्यात मोठे विमानतळ ‘बीजिंग न्यू एअरपोर्ट’ चीनमध्ये २०१९मध्ये वापरात येईल. या विमानतळाच्या बांधकामासाठी ८० अब्ज युआन (९.१ अब्ज पौंड) खर्च आला आहे.

बीजिंग : जगातील सगळ्यात मोठे विमानतळ ‘बीजिंग न्यू एअरपोर्ट’ चीनमध्ये २०१९मध्ये वापरात येईल. या विमानतळाच्या बांधकामासाठी ८० अब्ज युआन (९.१ अब्ज पौंड) खर्च आला आहे. विमानतळाचा आकार अतिप्रचंड आकाराच्या फुलासारखा असून, ते दक्षिण डॅक्सिंग जिल्ह्यात आहे.हे विमानतळ चायना सदर्न एअरलाइन्स आणि चायना ईस्टर्न एअरलाइन्सच्या विमानांसाठीतळ म्हणून वापरले जाईल. या तळामुळे दोन उड्डाणांदरम्यान प्रवाशांना सहजपणे प्रवेश मिळेल. त्याची क्षमता जास्तीतजास्त १०० दशलक्ष प्रवाशांना हाताळण्याची अपेक्षित आहे. तथापि, पहिल्या टप्प्यात दरवर्षी ७२ दशलक्ष प्रवाशांना तेथे सेवा मिळेल.विमानतळाच्या इमारतीचा नकाशा दिवंगत झाहा हादीद यांनी तयार केला असून, विमानतळावर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय उड्डाणेही हाताळली जातील.५२ हजार टन पोलाद आणि सुमारे १.६ दशलक्ष क्युबिक मीटर्स काँक्रिट त्यासाठी वापरण्यातआले आहे. विमानतळाच्या सांगाड्याचा विस्तार ४७ चौरस किलोमीटर आहे. बीजिंगमधील सध्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार या नव्या विमानतळामुळे बºयापैकी कमी होईल. बीजिंग विमानतळ दरवर्षी जगातील दुसºया क्रमांकाच्या प्रवासी वाहतुकीला हाताळणारे आहे.