हाफीज सईदवरील आरोप घेतले मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:50 IST2017-10-16T01:50:42+5:302017-10-16T01:50:54+5:30
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद व त्याच्या ‘जमात-उद-दवा’ या संघटनेवरील दहशतवादाचे आरोप मागे घेण्यात आल्याने हाफीजची प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेतून सुटका सुकर होणार आहे.

हाफीज सईदवरील आरोप घेतले मागे
लाहोर : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद व त्याच्या ‘जमात-उद-दवा’ या संघटनेवरील दहशतवादाचे आरोप मागे घेण्यात आल्याने हाफीजची प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेतून सुटका सुकर होणार आहे. हाफीज आणि त्याच्या चार सहकाºयांना पंजाब प्रांतिक सरकारने दहशतवादविरोधी कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे. मात्र पुरावे दिले नाहीत तर आम्ही हाफीजच्या सुटकेचा आदेश देऊ, असे लाहोर उच्च न्यायालयाने बजावले होते. हाफीजला जानेवारीत स्थानबद्ध करून नजरकैदेत ठेवले होते.(वृत्तसंस्था)