सौंदर्यच ठरलं तिच्यासाठी शाप, घरातून बाहेर पडणंही झालं कठीण, मग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2022 17:24 IST2022-10-02T17:23:57+5:302022-10-02T17:24:33+5:30
Beauty: सुंदर दिसण्यासाठी आजच्या काळात प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करत असतो. मात्र एका तरुणीला तिचं सौंदर्यच शाप बनल्यासारखं त्रासदायक ठरू लागलं होतं.

सौंदर्यच ठरलं तिच्यासाठी शाप, घरातून बाहेर पडणंही झालं कठीण, मग...
लंडन - सुंदर दिसण्यासाठी आजच्या काळात प्रत्येकजण काही ना काही प्रयत्न करत असतो. मात्र एका तरुणीला तिचं सौंदर्यच शाप बनल्यासारखं त्रासदायक ठरू लागलं होतं. ही कुणी साधीसुधी तरुणी नाही आहे तर ती आहे मिस इंग्लंड नताशा हेमिंग्स. तुम्हाला ही गोष्ट थोडी विचित्र वाटू शकते. तुम्ही म्हणाल की सुंदर दिसल्याने कुणाला काय अडचणी येऊ शकतात? पण या तरुणीसोबत घडलेला प्रकार खरा आहे.
२६ वर्षीय नताशा हिने तिच्यासोबत घडलेल्या घटनांचे काही अनुभव शेअर करताना धक्कादायक माहिची दिली आहे. तिने सांगितलं की, जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. तेव्हा अनेक विद्यार्थी माझ्यावर जळायचे. तसेच मला त्रास देण्याचा प्रयत्न करायचे. आता मिस इंग्लंड बनल्यानंतर तिने त्रास देणाऱ्या या सर्वांना चोख उत्तर दिलं आहे.
नताशा हिच्या जीवनात एक वेळ अशी आली होती की, तिने या सर्व त्रासाला कंटाळून स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतले होते. तसेच तिथून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एवढ्या अडचणींचा सामना केल्यानंतरही तिने ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेतला आणि त्यात विजयही मिळवला. तिने २०१५-१६ मध्ये मिस इंग्लंडचं विजेतेपद पटकावलं होतं. त्याशिवाय नताशा हिला संगीत ऐकायलाही खूप आवडते.
नताशा तिने जीवनात केलेला संघर्ष आणि मिळवलेल्या यशामुळे अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लवकरच तिचा पहिला म्युझिक अल्बम रिलीज होणार आहे. अशा प्रकारे त्रास सहन केल्यानंतरही तिने तिचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. आता नताशा तिच्या या कहाणीमधून इतरांना प्रेरित करत असते.