सावधान, जास्त वेळ फेसबुकमध्ये गुंतू नका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2017 00:58 IST2017-03-23T00:58:53+5:302017-03-23T00:58:53+5:30
फेसबुकवर तासन्तास वेळ घालविणाऱ्यांची संख्या तशी कमी नाही. याबाबत आता संशोधकांनीच धोक्याचा इशारा दिला आहे.

सावधान, जास्त वेळ फेसबुकमध्ये गुंतू नका!
वॉशिंग्टन : फेसबुकवर तासन्तास वेळ घालविणाऱ्यांची संख्या तशी कमी नाही. याबाबत आता संशोधकांनीच धोक्याचा इशारा दिला आहे. डीपॉल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी पदवीचे शिक्षण घेत असलेल्या ३४१ जणांवर अभ्यास करून काही निष्कर्ष काढले आहेत. त्यानुसार, जे लोक पुन्हा पुन्हा कारण नसताना फेसबुकमध्ये खेळत बसतात. त्यांची बिहेविअरल कंट्रोल स१स्टिम (वर्तन) दुबळी झालेली असते. त्यामुळेच कारण नसताना अशा व्यक्ती सोशल मीडियावर काहीतरी सर्च करीत असतात. या अभ्यासात दिसून आले की, ७६ टक्के विद्यार्थी वर्गातही फेसबुक पाहत असतात. ४० टक्के लोकांनी तर वाहन चालवितानाही फेसबुक पाहत असल्याची कबुली दिली आहे. ६३ टक्के व्यक्ती इतरांशी चर्चा करतानाही फेसबुकवर गुंग असतात. ६५ टक्के व्यक्ती काम सोडून फेसबुकमध्ये गुंतून पडल्याचे आढळून आले आहे. एकूणच काय, तर फेसबुकचा अति वापर स्वत:साठी घातक ठरत असल्याचे दिसून येत आहे.