लंडन - पाच वर्षांपूर्वीची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाची चित्रफीत संपादित करून प्रेक्षकांनी दिशाभूल केल्याप्रकरणी बीबीसी या वृत्तसंस्थेचे वरिष्ठ संचालक टिम डेव्ही व वृत्तप्रमुख डेबराह टर्नेस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. जानेवारी २०२१मध्ये कॅपिटल हिलवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. त्यावेळी ट्रम्प यांचे भाषण अशा प्रकारे संपादित केले, की ज्यात ट्रम्प आपल्या समर्थकांना दंगल घडवण्यास उद्युक्त करत असल्याचे वाटत होते.
ट्रम्प नेमके काय म्हणाले ?कॅपिटलहिल येथील भाषणात ट्रम्प यांनी आपल्या समर्थकांना ‘आपण सर्वजण कॅपिटलपर्यंत जाऊया. तेथे आपल्या धाडसी सिनेटर व काँग्रेस सदस्यांचा उत्साह वाढवूया,’ असे आवाहन केले होते.पण बीबीसीच्या पॅनोरामा या शोमध्ये, ‘आपण सर्वजण कॅपिटलपर्यंत जाऊया... आणि मीही तुमच्याबरोबर असेन. आपण पुऱ्या ताकदीनिशी लढूया,’ असे ट्रम्प समर्थकांना आवाहन करत होते.वास्तविक ट्रम्प यांनी ५० मिनिटांच्या अंतरात दोन वेगवेगळी भाषणे केली होती आणि बीबीसीने या दोन भाषणांमधील ट्रम्प वेगवेगळी वक्तव्ये जोडली होती. त्यामुळे ट्रम्प दंगल घडवत असल्याची प्रेक्षकांची दिशाभूल होत होती.
Web Summary : BBC heads resigned after a Trump video was deceptively edited. The altered video made it appear Trump incited Capitol riots, misleading viewers about his actual words and intent during the speech.
Web Summary : ट्रंप के वीडियो में संपादन के चलते बीबीसी प्रमुखों ने इस्तीफा दिया। वीडियो में ट्रंप को कैपिटल दंगों के लिए उकसाने वाला दिखाया गया, जिससे दर्शकों को गुमराह किया गया। वास्तविक भाषण अलग था।