बांगलादेशच्या युनूस सरकारला धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत थांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 15:57 IST2025-01-26T15:57:02+5:302025-01-26T15:57:18+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशच्या युनूस सरकारला मोठा धक्का दिला आहे. त्यांनी बांगलादेशला अमेरिकेची मदत तात्काळ थांबवली आहे.

Bangladesh's Yunus government in shock Donald Trump stops US aid | बांगलादेशच्या युनूस सरकारला धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत थांबवली

बांगलादेशच्या युनूस सरकारला धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत थांबवली

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. दुसऱ्या दिवशीपासून ट्रम्प अॅक्शमोडवर आले आहेत. पहिल्यांदा त्यांनी अमेरिकेतील बेकायदेशीर निर्वासितांवर कारवाई केली. आतापर्यंत ५७८ लोकांवर कारवाई केली आहे. दरम्यान, आता भारता शेजारील असलेला देश बांगलादेशावर मोठी कारवाई केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशला दिली जाणारी मदत पुढचे तीन महिने थांबवण्याचे आदेश दिले आहेत, यामुळे आता बांगलादेशच्या अडचणी वाढल्या आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांनी USAID/बांगलादेश करार, कार्य आदेश, अनुदान, सहकारी करार किंवा इतर सहाय्य किंवा संपादन साधनांतर्गत कोणतेही काम तात्काळ थांबवण्याचे किंवा निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. 

पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मार्च... मुख्यमंत्र्यांचा पाठिंबा; म्हणाले, "पंजाबी कधीही मान झुकवत नाहीत"

अमेरिकेत सत्ता हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक अनेक मोठे निर्णय घेत आहेत. त्यांनी अनेक देशांना आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीवर ९० दिवसांसाठी बंदी घातली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी युक्रेनला देण्यात येणारी मदत थांबवली होती. रशियासोबत सुरू असलेल्या युद्धात बायडेन प्रशासनाने युक्रेनला बरीच मदत करणे सुरू ठेवले, पण डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेत येताच ती मदत थांबवली आहे.

 ट्रम्प यांनी बांगलादेशला दिला झटका

बांगलादेशचे मोहम्मद युनूस हे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांचे जवळचे मानले जातात.  ट्रम्प प्रशासनाने पुढील महिन्यात होणाऱ्या नॅशनल ब्रेकफास्ट प्रेयर्स बीएनपी नेत्यांनाही आमंत्रित केले आहे.

या बैठकीनंतर, अमेरिका बांगलादेशात लवकरच निवडणुका घेण्यासाठी दबाव टाकू शकतो असं मानले जात आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी शेख हसीना बांगलादेश सोडून गेल्या आहेत, आता बांगलादेशात सत्तांतर झाले असून युनुस शेख यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी काही दिवसापूर्वी बांगलादेशबाबत विधान केले होते. म्हणाले होते की, सरकारला ८५ दिवसांच्या आत सर्व परदेशी मदतीचा अंतर्गत आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेताच जगभरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारी रोजी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यानंतर, त्यांनी काही तासांत जो बायडेन यांनी घेतलेले अनेक निर्णय बदलले आहेत. ट्रम्प यांनी आता धोरणे बदलण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Bangladesh's Yunus government in shock Donald Trump stops US aid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.