बांगलादेशातील २०२४ च्या ऐतिहासिक विद्यार्थीआंदोलनातील एक मुख्य चेहरा आणि 'इन्कलाब मंच'चा प्रवक्ता शरीफ उस्मान हादी यांचे गुरुवारी (१८ डिसेंबर २०२५) सिंगापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. ढाका येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्याच्या निधनाने संपूर्ण बांगलादेशात शोककळा पसरली असून तणावाचे वातावरण आहे. अनेक ठिकानी हिंसाचारही उफाळून आला आहे.
हादी गेल्या १२ डिसेंबरला ढाका येथील पलटन भागात ऑटोने जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. गोळी थेट डोक्यात लागल्याने त्याची प्रकृती चिंताजनक होती. त्याला ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आणि नंतर, चांगल्या उपचारासाठी एका खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मात्र, योग्य रिस्पॉन्स मिळत नसल्याने, त्याला १५ डिसेंबर रोजी एअरलिफ्ट करून सिंगापूरला हलवण्यात आले. त्याच्यावर न्यूरोसर्जिकल आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही तो वाचू शकला नाही.
कोण होता शरीफ उस्मान हादी? -शरीफ उस्मान हादी हा शेख हसीना यांच्या विरोधातील संघटना 'इंकलाब मंच'चा एक मुख्य चेहरा होता. तो संघटनेचा प्रवक्ताही होता. तसेच, आगामी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकीसाठी ढाका-8 मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून प्रचारही करत होता. जुलै 2024 मध्ये झालेल्या विद्यार्थीआंदोलनादरम्यान इंकलाब मंच चर्चेत आला होता. याच संघटनेने तत्कालीन पंतप्रधान शेख हसिना यांच्या सत्तेला आव्हान दिले होते.
मदरशात शिक्षक म्हणून कार्यरत होते वडील - उस्मान बिन हादीचा जन्म बांगलादेशातील झलकाठी जिल्ह्यात झाला होता. त्याचे कुटुंब धार्मिक आहे. त्याचे वडील एका मदरशात शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्याने आपल्या प्राथमिक शिक्षण नेसराबाद कामिल मदरशातूनच पूर्ण केले होते. हादीच्या मृत्यूने बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.
Web Summary : Student leader Sharif Usman Hadi, a key figure in Bangladesh's 2024 protests, died in Singapore after being shot in Dhaka. His death sparked widespread grief and renewed political tension. Hadi, an independent candidate and critic of Sheikh Hasina, was shot on December 12th. He was a prominent voice against the government.
Web Summary : बांग्लादेश में 2024 के विरोध प्रदर्शनों में प्रमुख छात्र नेता शरीफ उस्मान हादी की ढाका में गोली लगने के बाद सिंगापुर में मौत हो गई। उनकी मौत से व्यापक शोक और राजनीतिक तनाव बढ़ गया। शेख हसीना के आलोचक हादी को 12 दिसंबर को गोली मारी गई थी। वे सरकार के खिलाफ एक प्रमुख आवाज थे।