शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
4
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
5
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
7
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
8
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
9
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
10
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
11
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
12
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
13
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
14
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
15
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
16
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
17
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
18
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
19
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
20
Beauty Jha : संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 20:05 IST

Bangladesh Hindu Issue: बांगलादेशच्या अंतरिम यूनुस सरकारचा मोठा निर्णय

Bangladesh Hindu Issue: अंतरिम युनूस सरकारच्या काळात बांगलादेशातीलहिंदूंवर सतत हल्ले होत आहेत. त्यांच्यावर होणारे अत्याचार कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता युनूस सरकारने हिंदूंच्या हक्कांवरही अतिक्रमण सुरू केले आहे. बांगलादेश सरकारने २०२६च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, बांगलादेशातील हिंदूंना सरस्वती पूजा, बुद्ध पौर्णिमा, जन्माष्टमी किंवा दुर्गाष्टमीसाठी कोणतीही सुट्टी मिळणार नाही. तसेच, मे दिनाचीही सुट्टी दिली जाणार नाही. शिवाय, अधिकृत सुट्टीच्या यादीत कुठेही भाषा शहीद दिनाच्या सुट्टी उल्लेख करण्यात आलेला नाही. यामुळे बांगलादेशमध्ये वाद निर्माण झाला आहे.

अंतरिम सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, देशातील सर्व शाळा या सर्व दिवशी सुरु राहतील. यामुळे काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. रमजान आणि ईद-उल-फित्र दरम्यान सुट्ट्या दिल्या जात असताना, मागील काळाच्या तुलनेत हिंदू सणांना व उत्सवांना दिल्या जाणाऱ्या सुट्ट्यांच्या दिवसांची संख्या कमी करण्यात आली आहे यावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

भाषा चळवळीचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न

काहींनी आरोप केला आहे की यावेळी युनूस सरकार बांगलादेशच्या इतिहासातून भाषा चळवळ पुसून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या दीड वर्षात, युनूसच्या अंतरिम सरकारने बांगलादेशच्या इतिहासावर परिणाम करणारे असंख्य निर्णय घेतले आहेत. मुक्ती युद्धाचे अनेक पैलू पुसून टाकले गेले आहेत. बंगबंधू देखील बांगलादेशातून गायब झाले आहेत. यावेळी भाषा दिनाला लक्ष्य केले गेले आहे.

युनूस सरकारच्या जवळच्या लोकांचा असा दावा आहे की यावर्षी २१ फेब्रुवारी हा शनिवार आहे. बांगलादेशमध्ये शुक्रवार आणि शनिवार आधीच साप्ताहिक सुट्ट्या आहेत. म्हणून, सरकारी अधिसूचनेत भाषा दिनाचा विशेष उल्लेख नव्हता. २०२५ मध्ये २१ फेब्रुवारी हा शुक्रवार आहे, बांगलादेशमध्ये साप्ताहिक सार्वजनिक सुट्टी आहे, तरीही सरकारी सुट्टीच्या अधिसूचनेत तो दिवस भाषा दिन सुट्टी म्हणून उल्लेख होता.

युनूस सरकारच्या निर्णयाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले

शिक्षणतज्ज्ञ पवित्रा सरकार यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले की, सरकार मूर्ख आणि अशिक्षित आहे. २१ फेब्रुवारी रोजी बंगाली भाषेला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. या भाषेचा इतिहास जगभरातील अनेक भाषांशी जोडलेला आहे. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी तत्कालीन पूर्व पाकिस्तानमध्ये (आता स्वतंत्र बांगलादेश) विद्यार्थ्यांनी बंगालीला राज्यभाषा बनवण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले होते. पाकिस्तानी पोलिसांनी ही चळवळ दडपण्यासाठी गोळीबार केला होता. यात बरकत, सलाम, रफिक आणि जब्बार मारले गेले. अनेकांच्या मते, ही भाषा चळवळ बांगलादेशच्या स्वातंत्र्य चळवळीला चालना देणारी होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh cancels Hindu holidays amidst attacks, sparks controversy and outrage.

Web Summary : Bangladesh's government faces backlash for cancelling Hindu holidays like Durga Puja. Critics allege erasure of language movement history and disregard for minority rights, sparking widespread discontent.
टॅग्स :BangladeshबांगलादेशHinduहिंदू