शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

बांग्लादेशात पुन्हा सत्तापालट होणार? लष्करप्रमुखांचे सैनिकांना ढाक्यात येण्याचे आदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 14:44 IST

Bangladesh Unrest: बांग्लादेशात नवी सरकार आले, पण अद्याप परिस्थिती सुधारली नाही.

Bangladesh Unrest: काही महिन्यांपूर्वी हिंसक संघर्षानंतर बांग्लादेशातील शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकण्यात आले. हसीना यांना सत्तेवरुन हटवल्यानंतर मोहम्मद युनूस अंतरिम सरकारचे प्रमुख बनले. नवीन सरकार आल्यानंतर देशातील परिस्थिती पूर्ववत होईल, अशी अपेक्षा होती, मात्र आता परिस्थिती आणखी बिघडताना दिसत आहे. अशातच एक मोठी माहिती समोर आली आहे. बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांनी आपल्या सर्व सैनिकांना राजधानी ढाका येथे एकत्र येण्याचे आदेश दिले आहेत. 

नॉर्थ-ईस्ट न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, बांग्लादेश लष्कराने शुक्रवारी लष्करी वाहने आणि प्रत्येक ब्रिगेडमधील 100 सैनिकांना ढाका गाठण्याचे निर्देश दिले. हा आदेश का देण्यात आला हे स्पष्ट झालेले नाही, मात्र गेल्या काही आठवड्यातील घटना पाहिल्यास हा आदेश काही मोठ्या घटनेची चिन्हे असू शकतात.

लष्कराचा आदेश या दोन घटनांशी संबंधित?अलीकडेच अशा दोन घटना घडल्या आहेत, ज्यामुळे लष्कराने हे पाऊल उचलले असावे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थी नेता आणि ग्रामीण विकास आणि सहकार मंत्रालयाचा सल्लागार आसिफ महमूद शाजिब भुईया याचा एक जुना व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो असा दावा करताना दिसतो की, लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-झमान यांनी मोहम्मद युनूसकडे बांग्लादेशची सत्ता सोपवण्यास अनिच्छेने सहमती दर्शवली होती.

यापूर्वी, आणखी एक विद्यार्थी नेता हसनत अब्दुल्ला याने 11 मार्च रोजी जनरल जमान यांच्याशी गुप्त बैठकीनंतर लष्कराविरोधात आंदोलन छेडण्याची जाहीर धमकी दिली होती. कारण लष्करप्रमुखांनी शेख हसीना यांचा पक्ष 'अवामी लीग' बांग्लादेशच्या राजकारणात परत येण्याबाबत आणि निवडणूक लढविण्याबाबत भाष्य केले होते. या दोन घटना पाहता, बांग्लादेशात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे आहेत.

लष्करप्रमुखांनी हे पाऊल का उचलले?लष्करप्रमुख आणि सध्या बांग्लादेशात सत्ता गाजवणारे नेते यांच्यात सर्व काही सुरळीत दिसत नाही. बांग्लादेशातील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्करप्रमुख युनूस प्रशासनाला सातत्याने इशारा देत असल्याचे अनेक वृत्तांतून समोर आले आहे. अशा स्थितीत लष्करप्रमुख पुन्हा एकदा शेख हसीना यांच्या अवामी लीगचा मार्ग मोकळा करत असल्याची भीती विद्यार्थी नेत्यांना आहे. यामुळेच सध्या बांग्लादेशची धुरा सांभाळणारे लोक लष्कराची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लक्षात घेऊन लष्करप्रमुखांनी आतापासूनच कोणत्याही मोठ्या आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी सुरू केली आहे. ढाका येथे सैन्य जमा करण्याच्या आदेशाकडे या तयारीच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

टॅग्स :BangladeshबांगलादेशInternationalआंतरराष्ट्रीय