शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

आपलं नातं 'जन-जन का, मन से मन का...'; जाणून घ्या, मतुआ समाजाला संबोधित करताना काय म्हणाले मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 15:48 IST

पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत असतानाच पंतप्रधान मोदींनी मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा केली. पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाची संख्या जवळपास 2 कोटी एवढी आहे. हा समाज पश्चिम बंगालमधील मतांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

ढाका - पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या बांगलादेश  दौऱ्यावर आहेत. मोदींनी शनिवारी ओराकांडी येथील मतुआ समाजाच्या मंदिराला भेट दिली. येथे त्यांनी पूजाही केली. ओराकांडी येथे मतुआ समाजाचे संस्थापक हरिशचंद्र ठाकूर यांचा जन्म झाला होता. मोदी म्हणले मी अनेक वर्षांपासून या संधीची वाट पाहत होतो. मी 2015 मध्ये जेव्हा बांगलादेश दौऱ्यावर आलो होतो. तेव्हा मी ओराकांडीला येण्याची इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा आज पूर्ण झाली.

मोदी म्हणाले, मला आठवते, की मी पश्चिम बंगालमध्ये ठाकुरनगरमध्ये गेलो होतो. तेथील माझ्या मतुआ भाऊ-बहिणींनी मला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच प्रेम दिले होते. विशेषतः ‘बॉरो-मां’चा आपलेपणा, आई प्रमाणेच त्यांचा आशीर्वाद, माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे क्षण आहेत.

Narendra Modi in Bangladesh: निवडणूक बंगालमध्ये, PM मोदी बांगलादेशातील मंदिरांमध्ये करतायत पूजा! असा काढला जातोय राजकीय अर्थ

मोदी म्हणाले, मी बांगला देशच्या राष्ट्रीय उत्सवानिमित्त भारतातील आपल्या 130 कोटी भाऊ आणि बहिणींच्या वतीने आपल्यासाठी प्रेम आणि शुभेच्छा आणल्या आहेत. आपल्या सर्वांना बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या 50 व्या वर्षानिमित्त खूप-खूप शुभेच्छा. एवढेच नाही, तर दोन्ही देशांत आपले नाते 'जन-जन का, मन से मन का आहे,' असेही मोदी म्हणाले.

मंदिरात पूजा केल्यानंतर मोदींनी येथील मतुआ समाजाला संबोधित केले. एका व्यक्तीशी केलेल्या चर्चेचा हवाला देत मेदी म्हणाले, कुणी विचार तरी केला होता का, की एखादा भारतीय पंतप्रधान येथे येईल आणि मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा करेल.

West Bengal Election Voting: पश्चिम बंगालमध्ये 4 मिनिटांत अचानक घटलं मतदान! TMC ची निवडणूक आयोगाकडे तक्रार

म्हणून मतुआ समाज महत्वाचा - पश्चिम बंगालमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत असतानाच पंतप्रधान मोदींनी मतुआ समाजाच्या मंदिरात पूजा केली. पश्चिम बंगालमध्ये मतुआ समाजाची संख्या जवळपास 2 कोटी एवढी आहे. हा समाज पश्चिम बंगालमधील मतांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.

जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊन दर्शन - आज पंतप्रधान मोदींनी आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ईश्वरीपूर गावातील प्राचीन जेशोरेश्वरी काली मंदिरात जाऊनही दर्शन घेतले आणि पूजा केली. मोदींच्या बांगलादेशातील या मंदिर भेटींकडे राजकीय दृष्टीनेही पाहिले जात आहे.

West assembly election 2021: बंगालमधील कांठी येथे शुभेंदू अधिकारी यांच्या भावाच्या गाडीवर हल्ला, टीएमसी नेत्यावर आरोप

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBangladeshबांगलादेशWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपा