बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 10:56 IST2025-12-19T10:56:04+5:302025-12-19T10:56:20+5:30
Bangladesh Violence: बांगलादेशात आरक्षणाच्या आंदोलनात पत्रकारांना लक्ष्य केले जात आहे. आंदोलकांचा म्होरक्या ओमान हादी याचा मृत्यू झाला असून देशात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. वाचा सविस्तर.

बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. गुरुवारी संतप्त आंदोलकांनी ढाका येथील दोन नामांकित वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर हल्ला करून इमारतीला आग लावली. या आगीच्या वेळी अनेक पत्रकार आणि कर्मचारी इमारतीत अडकले होते, ज्यांना अग्निशमन दलाने शिताफीने बाहेर काढले. तर जमावाने एका हिंदू व्यक्तीला मारहाण करत झाडाला टांगून जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे.
ढाका येथील द डेली स्टारच्या कार्यालयावर आंदोलकांनी अचानक हल्ला केला. आंदोलकांनी इमारतीच्या बाहेरील वाहनांची जाळपोळ केली आणि त्यानंतर कार्यालयाला आग लावली. धुराचे लोट आणि वाढत्या आगीमुळे कार्यालयातील पत्रकारांमध्ये घबराट पसरली होती. काही पत्रकार इमारतीच्या छतावर अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शिडीच्या साहाय्याने अनेक पत्रकारांचे प्राण वाचवले.
हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी बांगलादेश सरकारने देशातील मोबाईल इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. शाळा, महाविद्यालये आधीच बंद करण्यात आली असून, ढाकासह अनेक शहरांत लष्करी दले तैनात करण्यात आली आहेत. आंदोलकांचा म्होरक्या उस्मान हादी याला आठवड्याभरापूर्वी गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्याचा मृत्यू झाल्याने बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरु झाला आहे.