'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:40 IST2025-07-21T16:38:53+5:302025-07-21T16:40:24+5:30
Bangladesh Dhaka fighter plane crash: ढाकातील कॉलेज कॅम्पसजवळ FT-7BGI विमान कोसळले. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला. अनेक विद्यार्थी जखमी किंवा मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
Bangladesh Dhaka fighter plane crash: बांगलादेशची राजधानी ढाका येथे सोमवारी एक वाईट घटना घडली. बांगलादेशच्या हवाईदलाच्या लढाऊ विमानाचा अपघात झाला. ढाका येथील माइलस्टोन कॉलेजच्या उत्तरा कॅम्पसजवळ हे विमान कोसळले. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला. अनेक विद्यार्थी जखमी किंवा मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातग्रस्त विमान हे FT-7BGI होते. ते एक लढाऊ विमान आहे आणि ते चीनी बनावटीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चीनी मालाने दिला 'धक्का'
बांगलादेशने आपले हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी चीनकडून FT-7BGI खरेदी केले होते. हे विमान चेंगदू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन चीनने बनवले आहे. हे विमान F-7 लढाऊ विमानाची सर्वात प्रगत आवृत्ती असल्याचे म्हटले जाते. बांगलादेशने २०२२ मध्ये चीनकडून ३६ FT-7BGI विमाने खरेदी केली. हे विमान हवाई हल्ल्यांसाठी वापरले जाते आणि त्याची मर्यादा १७,५०० मीटर आणि ५७,४२० फूट इतकी आहे.
ऑपरेशन सिंदूरमध्येही चिनी विमानांची झालेली पोलखोल
संपूर्ण जगात चिनी शस्त्रांची पोलखोल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी ऑपरेशन सिंदूरमध्ये चिनी लढाऊ सामग्रीमुळे पाकिस्तानची फसगत झाली होती. भारताच्या हल्ल्यात लाहोरमधील चीनच्या हवाई संरक्षण रडारचे मोठे नुकसान झाले होते. पंजाबमधील चुनियान एअरबेसवर तैनात चीनचा YLC-8E अँटी-स्टील्थ रडार पूर्णपणे नष्ट झाला होता.
चीनकडून मिळवलेले ड्रोन आणि एआर-१ लेसर-गाइडेड क्षेपणास्त्रेही भारतीय संरक्षण यंत्रणेने हवेतच नष्ट केली होती. या कारवाईने हे सिद्ध केले की पाकिस्तानकडे असलेली चिनी शस्त्रे आणि लढाऊ विमाने गंभीर संकटाच्या काळात प्रभावी ठरली नव्हती.