शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

उत्तर कोरियात उपासमारीचे संकट; 3300 रुपये किलो विकली जातायेत केळी - रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 2:52 PM

north korea : उत्तर कोरियात खाद्यपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

नवी दिल्ली : अण्वस्त्र शस्त्रास्त्रांच्या चाचण्या करून जगभरात चर्चेत राहणाऱ्या उत्तर कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात उपासमार सुरु असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियामध्ये खाद्य संकट इतके मोठे आहे की, येथील खाद्यपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एक किलो केळ्यांची किंमत 3335 रुपये आहे, यावरून तेथील महागाईचा अंदाज येऊ शकतो. (banana is being sold for rs 3300 a kg and tea is being sold for rs 5200 the price of coffee will blow your senses in north korea )

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी प्रथमच कबूल केले आहे की, आपल्या देशात अन्नधान्याची तीव्र कमतरता आहे. गेल्या काही दिवसांत लाखो लोकांना अन्नही मिळालेले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

...यामुळे एवढी वाढली महागाईकिम जोंग-उन यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांसमवेत केलेल्या बैठकीत सांगितले की, गेल्या वर्षीच्या वादळामुळे आलेल्या पुरामुळे कृषी क्षेत्र धान्य उत्पादनाचे लक्ष्य गाठू शकले नाही. उत्तर कोरियामधील हे उपासमारीचे संकट कोरोना व्हायरसच्या साथीमुळे उद्भवले आहे. उत्तर कोरियाने शेजारच्या देशांसह आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या. यामुळे उत्तर कोरियाचा चीनबरोबरचा व्यापार कमी झाला.

जाणून घ्या, कॉफीची किंमत...उत्तर कोरिया खाद्यपदार्थ आणि इंधनासाठी चीनवर अवलंबून आहे. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर कोरियामध्ये एक किलो केळी  45 डॉलर म्हणजेट 3300 रुपयांना उपलब्ध आहेत, तर चहाची किंमत 70 डॉलर म्हणजे 5200 रुपये आणि कॉफीच्या एका पाकिटाची किंमत 100 डॉलर म्हणजेच 7300 रुपयांपेक्षा अधिक आहे.

टॅग्स :north koreaउत्तर कोरिया