उत्तर कोरियात उपासमारीचे संकट; 3300 रुपये किलो विकली जातायेत केळी - रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 02:52 PM2021-06-20T14:52:06+5:302021-06-20T14:53:13+5:30

north korea : उत्तर कोरियात खाद्यपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

banana is being sold for rs 3300 a kg and tea is being sold for rs 5200 the price of coffee will blow your senses in north korea  | उत्तर कोरियात उपासमारीचे संकट; 3300 रुपये किलो विकली जातायेत केळी - रिपोर्ट

उत्तर कोरियात उपासमारीचे संकट; 3300 रुपये किलो विकली जातायेत केळी - रिपोर्ट

Next

नवी दिल्ली : अण्वस्त्र शस्त्रास्त्रांच्या चाचण्या करून जगभरात चर्चेत राहणाऱ्या उत्तर कोरियामध्ये मोठ्या प्रमाणात उपासमार सुरु असल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियामध्ये खाद्य संकट इतके मोठे आहे की, येथील खाद्यपदार्थांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. एक किलो केळ्यांची किंमत 3335 रुपये आहे, यावरून तेथील महागाईचा अंदाज येऊ शकतो. (banana is being sold for rs 3300 a kg and tea is being sold for rs 5200 the price of coffee will blow your senses in north korea )

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग-उन यांनी प्रथमच कबूल केले आहे की, आपल्या देशात अन्नधान्याची तीव्र कमतरता आहे. गेल्या काही दिवसांत लाखो लोकांना अन्नही मिळालेले नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

...यामुळे एवढी वाढली महागाई
किम जोंग-उन यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांसमवेत केलेल्या बैठकीत सांगितले की, गेल्या वर्षीच्या वादळामुळे आलेल्या पुरामुळे कृषी क्षेत्र धान्य उत्पादनाचे लक्ष्य गाठू शकले नाही. उत्तर कोरियामधील हे उपासमारीचे संकट कोरोना व्हायरसच्या साथीमुळे उद्भवले आहे. उत्तर कोरियाने शेजारच्या देशांसह आपल्या देशाच्या सीमा बंद केल्या. यामुळे उत्तर कोरियाचा चीनबरोबरचा व्यापार कमी झाला.

जाणून घ्या, कॉफीची किंमत...
उत्तर कोरिया खाद्यपदार्थ आणि इंधनासाठी चीनवर अवलंबून आहे. मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर कोरियामध्ये एक किलो केळी  45 डॉलर म्हणजेट 3300 रुपयांना उपलब्ध आहेत, तर चहाची किंमत 70 डॉलर म्हणजे 5200 रुपये आणि कॉफीच्या एका पाकिटाची किंमत 100 डॉलर म्हणजेच 7300 रुपयांपेक्षा अधिक आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: banana is being sold for rs 3300 a kg and tea is being sold for rs 5200 the price of coffee will blow your senses in north korea 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app