चीनमध्ये रमझानवर प्रतिबंध
By Admin | Updated: July 3, 2014 12:02 IST2014-07-03T11:58:23+5:302014-07-03T12:02:40+5:30
चीनमधील शिनजियांग प्रांतात रमझानच्या दरम्यान रोझा ठेवण्यास सरकारने बंदी घातली आहे. प्रांतातील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये या बंदीचे आदेश पाठवण्यात आले आहेत.

चीनमध्ये रमझानवर प्रतिबंध
>ऑनलाइन टीम
बिजींग, दि. ३ - चीनमधील शिनजियांग प्रांतात रमझानच्या पवित्र महिन्यात रोझा ठेवण्यास सरकारने बंदी घातली आहे. प्रांतातील सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांमध्ये या बंदीचे आदेश पाठवण्यात आले असून या निर्णयाविरोधात चीनमधील मुस्लीम समुदायाने नाराजी व्यक्त केली आहे.
शिनजियांग प्रांतात मुस्लीम समाजाची लोकसंख्या लक्षणीय आहे. या समाजाने रोझा, प्रार्थना सभा आणि धार्मिक सभा घेतल्यास त्यामुळे समाजात विभाजनवादी मानसिकता वाढू शकते अशी भिती स्थानिक सत्ताधारी सरकारला वाटत आहे. त्यामुळे ही बंदी घातल्याची चर्चा आहे. सरकारी वाहिन्या. रेडिओच्या माध्यमातून या आदेशाची वारंवार माहिती दिली जात आहे. यात प्रांतातील
आजी - माजी सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, पक्ष कार्यकर्ते यांनी रमझानमध्ये सामील होऊ नये असा संदेशही स्थानिक वाहिन्यांवर झळकत आहे. यापूर्वी स्थानिक प्रशासनाने सर्व कर्मचा-यांना सुदृढ शरीरासाठी रोझा ठेऊ नये असे स्पष्ट आदेश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन करणा-या संघटना, व्यक्ती आणि समाजावर बंदी घालण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.