शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर कोरियाकडून पुन्हा "बॅलेस्टिक" क्षेपणास्त्राची चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2017 12:15 IST

उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली, असे जपान आणि दक्षिण कोरिया सरकारचे म्हणणं आहे.

ऑनलाइन लोकमत
सोल, दि. 4 - उत्तर कोरियानं पुन्हा एकदा बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली, असे जपान आणि दक्षिण कोरिया सरकारचे म्हणणं आहे. उत्तर कोरियानं  बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्राची चाचणी करत आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचं सामर्थ्य दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
 
यावर जपानचे असे म्हणणे आहे की, कदाचित  हे क्षेपणास्त्र जपानमधील सागरी परिसरातील विशेष आर्थिक क्षेत्रात पडले. आधीच तणावाचे वातावरण असताना उत्तर कोरियानं क्षेपणास्त्र आणि आण्विक चाचण्यांच्या प्रमाणात वाढ केली आहे. 
दक्षिण कोरिया आणि जपानमधील अधिका-यांच्या माहितीनुसार मंगळवारी हे क्षेपणास्त्र 40 मिनिटांत 930 किलोमीटरपर्यंत पोहोचले. 
 
जपानचे कॅबिनेट सचिव प्रमुखांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, उत्तर कोरिया वारंवार परिस्थिती चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या या कृती स्वीकारार्ह नाहीत. आम्ही याविरोधात तीव्र प्रतिकार दर्शवू आणि या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतो. 
(उत्तर कोरियाचा हल्ला परतवण्यास अमेरिकेची Anti missile सिस्टिम सज्ज)
 
 
मे महिन्यात दक्षिण कोरियाच्या राष्‍ट्रपतीपदी विराजमान झालेल्या मून जे इन यांनी उत्तर कोरियाशी चर्चा करून हा मुद्‍दा निकाली काढण्याचे आवाहन केले होते. मंगळवारी करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रानंतर मून यांनी सुरक्षा परिषदेची आपात्कालीन बैठक बोलावली. 
 
गेल्याच आठवड्यात मून यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेटदेखील घेतली होती.   ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत फोनवरुन उत्तर कोरियासंदर्भात बातचित केली होती.
यानंतर बरोबर एक दिवसानंतर उत्तर कोरियानं क्षेपणास्त्राची चाचणी केली. 
( जपान, अमेरिकेवर हल्ल्यासाठी उत्तर कोरिया बनवणार बॅलिस्टिक मिसाइल)
(अमेरिकेचा दबाव झुगारून उत्तर कोरियाची पुन्‍हा बॅलेस्टिक क्षेपणास्‍त्र चाचणी)
दरम्यान,  मे महिन्यातही उत्तर कोरियानं बॅलेस्टिक क्षेपणास्‍त्र चाचणी केली होती. आंतरराष्‍ट्रीय दबावाला झुगारून उत्तर कोरियाने पुन्‍हा क्षेपणास्‍त्र चाचणी घेऊन अमेरिकेला एक प्रकारे धक्का दिला.  
 
बीबीसीच्या माहितीनुसार, मे महिन्यात उत्तर कोरियाने कुसोंग शहरानजीकच्या समुद्रात स्‍थानिक वेळेनुसार 2,000 किलोमीटरच्या उंचीवरून मारा करणा-या क्षेपणास्त्राची चाचणी केली. पहाटे साडेपाच वाजण्याच्यादरम्यान हे क्षेपणास्‍त्र समुद्रात जवळपास सातशे किमी दूरपर्यंतच्या अंतरावर जाऊन पडले. संयुक्त राष्ट्रानं बॅलेस्‍टिक क्षेपणास्‍त्राच्या परीक्षणावर प्रतिबंध घातले आहेत. तत्पूर्वी उत्तर कोरियानं संयुक्त राष्ट्रांचे नियम पायदळी तुडवून दोन क्षेपणास्‍त्रांची चाचणी घेतली होती. मात्र, ही चाचणी अयशस्‍वी ठरली होती.
 
दरम्‍यान, दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपणाच्या चाचणीवर टीकाही केली होती.