शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

Imran Khan: इम्रान खान यांची खुर्ची धोक्यात?; पाकिस्तानी लष्कर प्रमुख बाजवा आणि ISI चीफमध्ये गुप्त बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 17:35 IST

Imran Khan's chair in danger: लष्करी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून इम्रान खान आणि लष्करप्रमुख बाजवा यांच्यात खटके उडत आहेत. आयएसआय प्रमुखांच्या बदलीवरून हा वाद सुरु झाला आहे.

पाकिस्तानचा ( Pakistan) पंतप्रधान हा लष्कराची कठपुतळी असतो. पंतप्रधान विरोधात गेला की त्याची खूर्ची काढून घेऊन तिथे लष्करी राजवट स्थापन होते. जनरल परवेझ मुशर्रफ हे देखील तसेच लष्करशहा बनले होते. आता पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि लष्करामध्ये खटके उडू लागले आहेत. यामुळे इम्रान खान यांची खूर्ची धोक्यात आली आहे. 

लष्करी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून इम्रान खान आणि लष्करप्रमुख बाजवा (Qamar Javed Bajwa) यांच्यात खटके उडत आहेत. आयएसआय प्रमुखांच्या बदलीवरून हा वाद सुरु झाला आहे. बाजवा यांनी सोमवारी इम्रान खान यांना न कळवताच आयएसआयच्या मुख्यालयाला भेट दिल्याने खळबळ उडाली आहे. बाजवा आणि आयएसआय प्रमुख फैज हामिद यांच्यात गुप्त बैठक झाली. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि अंतर्गत सुरक्षा यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. परंतू अद्याप संपूर्ण गोष्ट बाहेर आलेली नाही. या गुप्त बैठकीमुळे बाजवा कोणतीतरी मोठी चाल खेळत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे इम्रान खान यांची खूर्ची धोक्यात येण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनुसार जर लष्कर आणि आयएसआय एकत्र आले तर सरकारसाठी ही धोक्याची वेळ ठरू शकते. 

फैज हामिद यांना बढती देण्यात आली आहे, त्यांच्या जागी येणाऱ्या नव्या आयएसआय प्रमुखावरून इम्रान खान आणि बाजवा यांच्यात वाद सुरु आहे. हामिद यांना पेशावर कोअरचा कमांडर करण्यात आले आहे. तर त्यांची जागा लेफ्टनंट जनरल नदीम अहमद अंजुम घेणार आहेत. मात्र, पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाने अंजुम यांच्या नियुक्तीची अधिसूचनाच काढलेली नव्हती. यामुळे सरकार आणि लष्करामध्ये तणाव निर्माण झाला आहे.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानISIआयएसआय