शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 16:16 IST

Baba Vanga Predictions For 2025 : जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वी २०२५ बाबत मोठी भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीनुसार २०२५ मध्ये जगाच्या विनाशाची सुरुवात होणार आहे. तसेच हळूहळू मानवजातीचा अंत होईल

भविष्यवाणी, जगाचा अंत, महायुद्ध याबाबत मानवाच्या मनात नेहमीच कुतुहल राहिलेलं आहे. या भूतलावर असे अनेक भविष्यवेत्ते होऊन गेले, ज्यांनी केलेल्या भविष्यवण्या ह्या कालौघात खऱ्या ठरलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या भविष्यवाण्यांबाबत जाणून घेण्यासाठी जगात अधिकच उत्सुकता दिसून येते. आता २०२४ हे वर्ष शेवटच्या टप्प्यात आलं आहे, तर जगाला २०२५ चे वेध लागले आहेत. दरम्यान, २०२५ मध्ये घडणाऱ्या घटनांबाबत काही अशा भविष्यवाण्या समोर येत आहेत. त्यामधील काही भविष्यवाण्या ह्या लोकांची चिंता वाढवण्यासाठी पुरेशा आहेत.

जगातील प्रसिद्ध भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी अनेक वर्षांपूर्वी २०२५ बाबत मोठी भविष्यवाणी केली होती. या भविष्यवाणीनुसार २०२५ मध्ये जगाच्या विनाशाची सुरुवात होणार आहे. तसेच हळूहळू मानवजातीचा अंत होईल. शेवटी ५०७९ साल येईपर्यंत मानवाचा पृथ्वीवरून समूळ विनाश होईल.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार २०२५ मध्ये जगाच्या विनाशाला सुरुवात होईल. तसेच त्याची सुरुवात युरोपमधील एका संघर्षापासून होईल. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार २०२५ मध्ये अशा काही भयानक घटना घडतील, ज्या मानवतेला अंताच्या दिशेने घेऊन जातील. एवढंच नाही तर आणखी एक भविष्यवेत्ता नास्रेदेमस यानेही २०२५ मध्ये  युरोपमध्ये एका भयंकर संघर्षाला सुरुवात होण्याची भविष्यवाणी करून ठेवली आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही भविष्यवेत्त्यांची भविष्यवाणी खरी ठरली तर जग विनाशाच्या दिशेने जाण्याची शक्यता अधिक आहे.

दरम्यान, बाबा वेंगा यांच्या आणखी काही भविष्यवाण्यांनुसार वातावरणातील बदल, भूराजकीय परिस्थितीतील बदल इत्यादींमुळे पृथ्वीवर राहणं अशक्य होऊन जाईल. त्यामुळे सन २१३०मध्ये काही वेगळ्या प्राण्यांचा मानवांशी संपर्क येईल. त्यानंतर मानव आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी पृथ्वीबाहेर अन्यत्र आश्रयाला जाईल. अखेरीस ५०७९ मध्ये पृथ्वीवरून सारं काही संपुष्टात येईल.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय