Ayodhya Ram Mandir: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावर काल(25 नोव्हेंबर) रोजी धर्मध्वजाची स्थापना केली. मात्र, आता पाकिस्ताननं नेहमीप्रमाणे यावरही गरळ ओकली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं याला भारतातील मुस्लिम समाज आणि सांस्कृतिक वारशासाठी धोकादायक असल्याचं सांगत, आंतरराष्ट्रीय समुदायाला याकडे लक्ष वेधण्याचं आवाहनदेखील केलं.
पाकिस्ताननं नेमकं काय म्हटलं?
पाकिस्ताननं म्हटलं की, अयोध्येतील राम मंदिराची उभारणी आणि ध्वजारोहण हे भारतातील अल्पसंख्यकांना दडपण्याचा भाग असून, मुस्लिम धार्मिक स्थळांचे जाणूनबुजून नुकसान करण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानने बाबरी विध्वंसाचा उल्लेख करत, त्याला ‘ऐतिहासिक प्रार्थनास्थळ’ असल्याचे मत व्यक्त केले.
पाकिस्तानने भारतातील कथित इस्लामोफोबिया, हेट स्पीच आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचारांचा उल्लेख करत संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. भारतातील मशिदी आणि मुस्लीम सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.
भारताने पाकला दाखवला आरसा...
भारतावर धार्मिक वारशाचे नुकसान केल्याचा आरोप करताना पाकिस्तान स्वतःच्या देशातील हिंदू धार्मिक स्थळांच्या स्थितीवर मौन पाळत असल्याची टीका भारतातील विविध तज्ज्ञांकडून केली जाते. शारदा पीठ, कराचीतील जगन्नाथ मंदिर, रावळपिंडीतील मोहन मंदिर यांसारखी अनेक ठिकाणे पडीक स्थितीत असून, अनेकांवर सरकारी किंवा स्थानिकांचा कब्जा असल्याचा आरोप हिंदू संस्थांकडून वारंवार केला जातो.
Web Summary : Pakistan condemned the Ayodhya Ram Mandir's construction, calling it a suppression of Indian Muslims. They urged the UN to intervene, citing concerns over religious sites and minority rights. India counters, pointing to the neglect of Hindu temples in Pakistan.
Web Summary : पाकिस्तान ने अयोध्या राम मंदिर निर्माण की आलोचना करते हुए इसे भारतीय मुसलमानों का दमन बताया। उन्होंने संयुक्त राष्ट्र से धार्मिक स्थलों और अल्पसंख्यक अधिकारों पर हस्तक्षेप करने का आग्रह किया। भारत ने पाकिस्तान में हिंदू मंदिरों की उपेक्षा की ओर इशारा किया।