फक्त एक रुग्ण आढळल्यानंतर 'या' देशात लॉकडाऊन लागू केला होता, आता 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 02:33 PM2021-09-14T14:33:33+5:302021-09-14T14:33:59+5:30

coronavirus : ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरा येथे 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकरण समोर आले. सरकारने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आणि राजधानीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Australia's capital extends lockdown for a second month until October 15 | फक्त एक रुग्ण आढळल्यानंतर 'या' देशात लॉकडाऊन लागू केला होता, आता 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवला

फक्त एक रुग्ण आढळल्यानंतर 'या' देशात लॉकडाऊन लागू केला होता, आता 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवला

googlenewsNext

कॅनबरा : जगातील कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोका अद्याप टळलेला नाही. भारतासारख्या देशांमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण निश्चितपणे नियंत्रित झाले आहे. मात्र, अमेरिकेसारख्या देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती चांगली नाही. अमेरिकेसोबतच कोरोना व्हायरस अनेक युरोपियन देशांमध्येही चिंतेचे कारण बनला आहे. या महामारीवर मात करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन तसेच लसीचा पर्याय स्वीकारला आहे. अशा देशांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा समावेश आहे, जिथे कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. (Australia's capital extends lockdown for a second month until October 15)

ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरा येथे 12 ऑगस्ट रोजी कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंट प्रकरण समोर आले. सरकारने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आणि राजधानीत लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑस्ट्रेलिया कदाचित पहिला देश असेल जिथे फक्त एका कोरोना प्रकरणानंतर लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता राजधानी कॅनबरामध्ये कोविड -19 ची 22 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अशा परिस्थितीत लॉकडाऊन 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आला आहे.


कॅनबरामधील लॉकडाऊन 15 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात येईल, असे ऑस्ट्रेलियाई राजधानी क्षेत्राचे मुख्यमंत्री अँड्र्यू बर्र यांनी सांगितले. दरम्यान,  कॅनबरा न्यू साउथ वेल्स राज्याने वेढलेले आहे, जिथे ऑस्ट्रेलियामध्ये डेल्टा व्हेरिएंटचे पहिले प्रकरणे नोंदवण्यात आले होते. कोरोना व्हायरसवर नियंत्रण ठेवण्यात ऑस्‍ट्रेलियाई सरकार बऱ्याच अंशी यशस्वी झाले आहे. 430,000 लोकांच्या शहरात 10 जुलै 2020 पासून कॅनबरामध्ये डेल्टा व्हेरिएंट येण्यापूर्वी कोरो नाव्हायरस कम्युनिटी ट्रान्समिशनची एकही घटना नोंदवली गेली नव्हती. कदाचित याच कारणामुळे पहिले प्रकरण समोर येताच येथे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दुसरीकडे, अमेरिका, ब्राझील, रशिया इत्यादी देशांमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाची हजारो प्रकरणे दररोज नोंदवली जात आहेत, परंतु येथील सरकारने लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला नाही. भारतातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची सुमारे 30 हजार प्रकरणे नोंदवली जात आहेत. गेल्या 24 तासांत 25 हजार (25,404) पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Web Title: Australia's capital extends lockdown for a second month until October 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.