शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

अरे देवा! महिला डॉक्टरने मित्रांना दिलं घोड्यांना कंट्रोल करण्याचं इंजेक्शन, महागात पडली नशेची सवय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 19:02 IST

Lady Doctor Inject Horse tranquilliser to Friends : सध्या ऑस्ट्रेलियातील प्राण्यांची एक महिला डॉक्टर चर्चेत आहे. कारण या महिलेने स्वत:ला आणि तिच्या मित्रांना असं इंजेक्शन लावलं जे घोड्यांना दिलं जातं. 

ज्या लोकांना नशेची सवय असते, ते लोक नशा करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.  मग ते याचाही विचार करत नाहीत की, याचा आरोग्यावर किती परिणाम होईल. पण जेव्हा एक डॉक्टरच नशेच्या सवयीमुळे अशी चूक करत असेल तर चर्चा होईलच. सध्या ऑस्ट्रेलियातील (Australia) प्राण्यांची एक महिला डॉक्टर चर्चेत आहे. कारण या महिलेने स्वत:ला आणि तिच्या मित्रांना असं इंजेक्शन लावलं जे घोड्यांना दिलं जातं. 

पश्चिम ऑस्ट्रेलियाची राहणारी कॅथरीन मॅक्गुइगॅन (Catherine McGuigan), एक पशुचिकित्सक आहे. ती मुर्रे व्हेटरनरी सर्व्हिसेसमध्ये काम करत होती. पण तिला नोकरीहून काढण्यात आलं. कॅथरीन आणि तिच्या मित्रांनी एक दिवस ड्रग्स घेऊन हाय होण्याचा प्लॅन केला होता. यासाठी ती तिच्या हॉस्पिटलमधून केटमाइन नावाच्या इंजेक्शनची बॉटल सोबत घेऊन गेली होती.

काय असतं हे केटामाइन?

केटामाइन ट्रॅक्युलायजर असतं जे घोड्यांना आणि इतरही प्राण्यांना दिलं जातं. जेणेकरून त्यांना शांत केलं जावं. मनुष्याला दिल्यावर हे इंजेक्शन तेच काम करतं, जे ड्रग्सची नशा  केल्यावर मनुष्यासोबत होतं. डोकं सुन्न होतं आणि माणूस शांत होतो. हे एकप्रकारे प्राण्यांसाठी एनेस्थेशियासारखं काम करतं.  ऑस्ट्रेलियात हे औषध नेहमीच लॉक करून ठेवण्याचा नियम आहे. हे बाजारात सहज विकताही येत नाही.

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, यावर्षी ऑक्टोबरमध्ये कॅथरीन आणि तिचे मित्र कोकेनची नशा करत होते. तेव्हा कॅथरीन कारमधून केटामाइनची बॉटल घेऊन आली. त्यानंतर तिने मित्रांना ड्रग इंजेक्ट केलं आणि मित्रांना याबाबत कुणालाही काही न सांगण्यास बजावले. प्राण्यांची डॉक्टर असल्याने कॅथरीनकडे केटामाइन ठेवण्याचा अधिकार तर होता, पण ती याचा वापर मनुष्यांवर करू शकत नव्हती. आता मेडिकल क्षेत्राशी संबंधित एका चौकशी समितीने तिच्यावर २ लाखांपेक्षा रूपयांचा दंड ठोठावला आहे. इतकंच नाही तर तिचं डॉक्टरीचं लायसन्सही काढून घेतलं आहे. म्हणजे ती आता मेडिकल प्रॅक्टिस करू शकत नाही. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी