आठ मुलांच्या हत्याकांडाने आॅस्ट्रेलिया हादरला
By Admin | Updated: December 20, 2014 00:28 IST2014-12-20T00:28:36+5:302014-12-20T00:28:36+5:30
आॅस्ट्रेलियाच्या कायर्न्स शहरातील एका घरात आठ मुले मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे

आठ मुलांच्या हत्याकांडाने आॅस्ट्रेलिया हादरला
मेलबर्न : आॅस्ट्रेलियाच्या कायर्न्स शहरातील एका घरात आठ मुले मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही मुले दीड ते १५ वर्षे वयोगटातील असून चाकूने भोसकून त्यांचे हत्याकांड घडविण्यात आले.
घटनास्थळी जखमी महिला आढळून आली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या महिलेवरही चाकूनेच हल्ला करण्यात आला होता. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात येते. हत्या झालेल्या मुलांपैकी सात मुले या महिलेची आहेत.
मनुरा या उपनगरात ही भीषण घटना घडली. पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली असून गुप्तहेर घरात झडती घेत आहेत. पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नसून जखमी महिला तपासात सहकार्य करीत आहे. पंतप्रधान टोनी अबोट यांनी हा एक घृणास्पद गुन्हा असल्याचे म्हटले आहे. (वृत्तसंस्था)