शहरं
Join us  
Trending Stories
1
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
3
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
4
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
5
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
6
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
7
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
8
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
9
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
10
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
11
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
12
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
13
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
14
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
15
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
16
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
17
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
18
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
19
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
20
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच

तुर्कीसाठी भारताच्या मित्रावर दबावाचा प्रयत्न; पाकिस्तान समर्थक अझरबैजानची नवी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 17:50 IST

अझरबैजान त्या निवडक देशांपैकी एक आहे ज्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच्या बाजूने राहिला होता.

बाकू - पाकिस्तान कट्टर समर्थक अझरबैजानने आता भारताचा मित्र इस्त्रायलवर दबाव टाकला आहे. इस्त्रायल आणि तुर्कीतील संबंध सामान्य व्हावेत जेणेकरून त्याला फायदा होईल असं अझरबैजानने वाटते. सध्या इस्त्रायल आणि तुर्की यांच्यातील संबंध ताणले गेलेत. गाझा पट्टी, लेबनान आणि सीरियातील इस्त्रायली हल्ल्याने तुर्की नाराज आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैयप एर्दोगन यांनी अनेकदा इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना नव्या युगाचा हिटलर असं संबोधले आहे. गाझा पट्टीवर इस्त्रायलने नरसंहार केल्याचा आरोप लावला आहे. अझरबैजानचे तुर्की आणि इस्त्रायल दोन्ही देशांशी घनिष्ट संबंध आहेत.

भारताविरोधात उभा राहिला होता अझरबैजान

अझरबैजान त्या निवडक देशांपैकी एक आहे ज्यांनी पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईत पाकिस्तानच्या बाजूने राहिला होता. अझरबैजानने भारताच्या ऑपरेशन सिंदूरचा निषेध केला, ज्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवादी तळांना टार्गेट केले होते. ८ मे रोजी अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्र्‍यांनी पाकिस्तानोबत असल्याचे म्हटलं होते. अझरबैजान सरकारकडून पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांना पत्र पाठवून खुले समर्थन दिले होते. काही दिवसांपूर्वी शहबाज शरीफ यांनीही अझरबैजानचा दौरा केला होता. अझरबैजानने काश्मीर मुद्द्यावरही पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. 

तुर्की आणि इस्त्रायलमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न

अझरबैजानचे परराष्ट्र सल्लागार हिकमत हाजीयेव यांनी तुर्की आणि इस्त्रायलमध्ये बैठकीची पुष्टी केली आहे. शांतता चर्चेतून सीरियातील सुरक्षा धोका कमी करण्याचं काम अझरबैजान करत आहे. इस्तांबुल स्थित ग्लोबल जर्नलिझ्म कौन्सिलद्वारे आयोजित एका दौऱ्यात तुर्की आणि इस्त्रायल दोन्ही देश आमच्यावर भरवसा ठेवत आहेत असं म्हटलं आहे. तुर्कीच्या मदतीने इस्लामवादी नेतृत्वाचे एचटीएस बंडखोरांनी सीरियातील ताकदवान शासन अल असदर यांनी सत्ता उलथवून लावली. त्यानंतर इस्त्रायलच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यामुळे सत्ता परिवर्तनापासून इस्त्रायलने सीरियात शेकडो हल्ले केले. त्यात अलीकडेच शुक्रवारी हल्ला केला आहे. 

दरम्यान, तुर्कीचा जवळचा मित्र आणि धोरणात्मक भागीदार म्हणून अझरबैजानने सीरिया मुद्द्यासह प्रमुख आंतरराष्ट्रीय बाबींवर अंकाराच्या भूमिकेशी सातत्याने जुळवून घेतले आहे. परंतु, त्याचे इस्रायलशीही चांगले संबंध आहेत. इस्रायल अझरबैजानच्या तेलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्याच वेळी इस्रायल अझरबैजानसाठी एक प्रमुख शस्त्रास्त्र पुरवठादार आहे. अझरबैजानचे आर्मेनियाशी जुने वैर आहे. अशा परिस्थितीत त्यांना चांगल्या आणि शक्तिशाली शस्त्रांची आवश्यकता आहे, जी इस्रायल पूर्ण करतो  म्हणूनच इस्रायल आणि अझरबैजानमधील संबंध खूप मजबूत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIsraelइस्रायलSyriaसीरियाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारत