शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 20:17 IST

Attack on Ship in Red Sea: हुथी बंडखोर सातत्याने व्यावसायिक जहाजांवर हल्ले करत आहेत.

Attack on Ship in Red Sea: मध्यपूर्वेत आधीच सुरू असलेल्या युद्ध आणि संघर्षाच्या दरम्यान येमेनच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या एका व्यावसायिक जहाजावर रविवारी सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी जहाजावर गोळ्या आणि रॉकेट-प्रोपेल्ड ग्रेनेड (RPGs) डागले. प्रत्युत्तरादाखल, जहाजावरील सशस्त्र सुरक्षा पथकानेही गोळीबार केला. वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसने रविवारी ब्रिटिश लष्करी गटाच्या हवाल्याने ही माहिती दिली.

हुथी बंडखोरांचे हल्लेअलिकडच्या काही महिन्यांत, येमेनच्या हुथी बंडखोर गटाने या प्रदेशातील अनेक व्यावसायिक आणि लष्करी जहाजांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. गाझा पट्टीमध्ये हमासवर इस्रायलच्या हल्ल्यांच्या निषेधार्थ हे हल्ले करत असल्याचे त्यांचे म्हणने आहे. नोव्हेंबर २०२३ ते जानेवारी २०२५ दरम्यान, हुथींनी १०० हून अधिक व्यापारी जहाजांना लक्ष्य केले, त्यापैकी दोन बुडाले आणि चार खलाशांचा मृत्यूही झाला.

लाल समुद्रातील व्यापारावर मोठा परिणामहुथी हल्ल्यांमुळे लाल समुद्राच्या कॉरिडॉरमधून होणाऱ्या व्यापारावर मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षी या जलमार्गावरून सुमारे १ ट्रिलियन डॉलर्स किमतीच्या वस्तू जातात, परंतु वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे व्यापारात मोठी घट झाली आहे. यामुळे जागतिक पुरवठा साखळीवरही परिणाम होतोय. लाल समुद्राचा हा भाग केवळ धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा नाही, तर जागतिक व्यापारासाठी जीवनरेखा देखील आहे, त्यामुळे जग येथील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धwarयुद्ध