शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायलवरील हल्ला; हमासला इराणी मदत; ‘वॉल स्ट्रीट’चा दावा; बेरूतमध्ये शिजला कट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 08:33 IST

इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे अधिकारी १९७३ पासून इस्रायलवर जमीन, हवाई आणि समुद्राद्वारे सर्वांत मोठ्या हल्ल्याची योजना आखण्यासाठी ऑगस्टपासून हमाससोबत काम करत होते.

वॉशिंग्टन : इस्रायलवरील हल्ल्याची तयारी करण्यासाठी व त्याबाबतची योजना आखण्यासाठी इराणी सुरक्षा अधिकाऱ्यांनी हमासला मदत केली होती. त्यानंतर २ ऑक्टोबर रोजी बेरूतमध्ये झालेल्या बैठकीत कट शिजला आणि  नंतर हल्ल्याला हिरवा कंदील दिला होता, असा दावा अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने हमास आणि हिजबुल्लाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हवाला देत केला.

वृत्तानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे अधिकारी १९७३ पासून इस्रायलवर जमीन, हवाई आणि समुद्राद्वारे सर्वांत मोठ्या हल्ल्याची योजना आखण्यासाठी ऑगस्टपासून हमाससोबत काम करत होते. ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर इराणमधील लोकांनीही आनंदोत्सव साजरा केला. दरम्यान, इराणने हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. 

नागरिकांच्या मदतीसाठी धावाधाव- मानवतावादी गट इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी, त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी झटत आहेत; - परंतु, गाझाच्या तीव्र नाकेबंदीमुळे व लढाईमुळे ते गुंतागुंतीचे होत आहे. इजिप्तच्या रेड क्रॉस संघटनेकडून दाेन टनापेक्षा जास्त वैद्यकीय पुरवठा गाझाला पाठविण्यात आला आहे. अन्न आणि इतर वितरण आयोजित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

कैद्यांच्या सुटकेसाठी ओलिसांचा वापरहमासच्या वरिष्ठ कमांडरने म्हटले की, गाझामधील विध्वंसक युद्ध सुरू राहिल्यास इराण आणि हिजबुल्लासारखे मित्र या लढाईत मदतीला येतील. २०१४ च्या युद्धापासून हमास स्वतःचे रॉकेट आणि प्रशिक्षित सैनिक तयार करत आहे. ओलिस ठेवलेल्या शेकडो इस्रायलींचा वापर इस्रायली आणि  सर्व अरब तसेच पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेसाठी करेल, असेही ते म्हणाले.

इस्रायल, पॅलेस्टाईन समर्थनार्थ निदर्शनेकेम्ब्रिज : इस्रायल-हमास संघर्षाचे पडसाद आता जगभर पडत आहेत. विविध ठिकाणी इस्रायल व पॅलेस्टाईन समर्थकांनी त्यांच्या पाठिंब्यासाठी निदर्शने केली. ब्रिटनमधील केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स येथे निदर्शने करत असलेल्या पॅलेस्टाईन समर्थकांचा गट इस्रायल समर्थक गटापुढे आला. फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे हजारो इस्रायल समर्थकांनी हमासविरोधात निदर्शने केली.

इस्रायलच्या बाजूने कोणते देश उतरले? युद्धात इस्रायलला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली हे देश एकत्र आले आहेत. या देशांच्या पंतप्रधानांनी एकत्र येत युद्धाबाबत चर्चा केली. दहशतवादाला कधीही समर्थन नाही, असे या देशांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. 

नेतन्याहू यांचा पंतप्रधान मोदींना फोनइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युद्धाबाबतची माहिती दिली आहे. मोदी म्हणाले की, भारत  दहशतवादाचा तीव्र निषेध करतो. या कठीण काळात भारतीय जनता इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

पॅलेस्टाइनला पुतिन यांचा पाठिंबा ?मध्य पूर्वेबाबत अमेरिका राबवित असलेले धोरण अयशस्वी ठरल्यामुळेच इस्रायल-पॅलेस्टाइन  संघर्ष पेटला, अशी टीका रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे. इस्रायल व पॅलेस्टाइन या दोघांच्याही संपर्कात रशिया असल्याचे त्यांनी सांगितले.

११ नागरिकांच्या मृत्यूंचा बदला इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या अमेरिकन नागरिकांची संख्या ११ वर पोहोचली आहे. त्यामुळे अमेरिकेने इस्रायलला लष्करी मदत पाठविण्यास सुरुवात केली आहे. युद्धासाठी आणखी शस्त्रे पाठवली जाणार आहेत.

...तर इजिप्तच्या वाहनांवर हल्ला : इस्रायल  इस्रायलने गाझाची ‘संपूर्ण नाकेबंदी’ केली आहे. यात पूर्णपणे वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, अन्न आणि इंधन पुरवठाही थांबवण्यात आला आहे. जर गाझाला इजिप्तने वस्तूंचा पुरवठा केला तर इजिप्तच्या वाहनांवर हल्ला करण्यात येईल, असा इशारा इस्रायलने दिला आहे.

आम्हाला वाचवा - जीव जाण्याची भीती असलेल्या गाझास्थित भारतीय महिला लुबना नजीर शाबू यांनी मंगळवारी कुटुंबाला त्वरित बाहेर काढण्याची मागणी भारत सरकारकडे केली.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षwarयुद्धIsraelइस्रायल