Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 14:25 IST2025-11-05T14:23:51+5:302025-11-05T14:25:01+5:30

UPS cargo plane crash: अमेरिकेतील लुईसव्हिल मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच एक यूपीएस मालवाहू विमान कोसळले.

At least seven killed in UPS cargo plane crash at Louisville airport in US | Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!

Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!

अमेरिकेतील केंटकी येथील लुईसव्हिल मुहम्मद अली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच एक यूपीएस मालवाहू विमान कोसळले. हा अपघात इतका भयानक होता की, त्यामुळे परिसरात मोठी आग लागली आणि अनेक घरे जळून खाक झाली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर आकाशात दिसणाऱ्या दाट धुरामुळे संपूर्ण परिसर हादरला. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, त्यांनी मोठा आवाज ऐकला आणि नंतर आगीचा एक मोठा गोळा वर येताना दिसला. ही घटना लुईसव्हिल विमानतळाच्या दक्षिणेस असलेल्या फर्न व्हॅली रोड आणि ग्रेड लेनजवळ घडली, जिथे आग वेगाने पसरली.

लुईसव्हिलचे महापौर क्रेग ग्रीनबर्ग म्हणाले की, विमानात असलेले जेट इंधन हे अपघातामागील एक प्रमुख कारण होते. स्थानिक चॅनेल WLKY-TV शी बोलताना ते म्हणाले की, "माझ्या माहितीनुसार, विमानात अंदाजे २,८०,००० गॅलन इंधन होते. ही चिंतेची बाब आहे." ग्रीनबर्ग यांनी स्पष्ट केले की, या इंधन साठ्यामुळे आग वेगाने वाढली आणि जवळच्या घरांमध्ये पसरली."

अपघातानंतर, अधिकाऱ्यांनी विमानतळ बंद केले आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना दुसरीकडे आश्रय घेण्याचे आदेश दिले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथके मदत आणि बचाव कार्यात गुंतली आहेत. सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये विमान हवेत झुकताना, खाली पडताना आणि काही सेकंदातच एका भयानक स्फोटासह स्फोट होताना स्पष्टपणे दिसत आहे. लोकांनी सांगितले की, स्फोट इतका भयानक होता की, जवळच्या इमारती हादरल्या आणि अनेक घरांच्या खिडक्या फुटल्या.

यूपीएस युनायटेड पार्सल सर्व्हिसने पुष्टी केली आहे की, अपघातग्रस्त विमान त्यांचे होते आणि ते लुईसव्हिलहून होनोलुलुला प्रवास करत होते. ते MD-11 कार्गो विमान होते. कंपनीने म्हटले आहे की, "या अपघातामुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे आणि आम्ही तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत आहोत."

Web Title : केंटकी में यूपीएस विमान दुर्घटना: 3 की मौत, 11 घायल

Web Summary : लुइसविले, केंटकी से उड़ान भरने के तुरंत बाद एक यूपीएस मालवाहक विमान दुर्घटनाग्रस्त हो गया, जिसमें तीन लोगों की मौत हो गई और ग्यारह घायल हो गए। दुर्घटना से भारी आग लग गई, जिससे घरों को नुकसान पहुंचा। जेट ईंधन ने आग को और भड़का दिया। जांच जारी है।

Web Title : UPS Plane Crash in Kentucky: 3 Dead, 11 Injured

Web Summary : A UPS cargo plane crashed shortly after takeoff from Louisville, Kentucky, killing three and injuring eleven. The crash caused a large fire, damaging homes. Jet fuel exacerbated the blaze. Investigations are ongoing.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.