शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून मी इराणी लोकांना मारतोय आणि हा माझ्यासाठी सन्मानच", डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी, युद्ध वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:19 IST

Donald Trump On Iran War: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचे युद्ध आणखी लांबणार असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी एक पोस्ट करत इराणींना मारणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे म्हटले आहे. 

"आमच्याकडे अफाट शक्ती, अमर्याद दारुगोळा आणि भरपूर वेळ आहे. आज या नीच लोकांचे काय होते ते फक्त पहा", असे म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या विधानाने युद्ध लवकर थांबण्याची शक्यताही माळवताना दिसू लागली आहे. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत इराणी नेत्यांना पृथ्वी संपवल्याचा दावा केला आहे आणि राहिलेल्यांनाही अमेरिकेचा अध्यक्ष संपवणार असल्याची धमकी दिली आहे. 

"त्यांचे नेते पृथ्वीवरून संपवले"

ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "आम्ही इराणची दहशतवादी राजवट लष्करी, आर्थिक आणि इतर सर्व मार्गांनी पूर्णपणे नष्ट करत आहोत. पण जर तुम्ही 'न्यूयॉर्क टाइम्स' वृत्तपत्र वाचले, तर तुम्हाला चुकीचे वाटू शकते की आम्ही जिंकत नाही आहोत."

"इराणचे नौदल संपले आहे, त्यांची वायुसेना आता उरलेली नाही. त्यांची क्षेपणास्त्रे, ड्रोन्स आणि इतर सर्व काही उद्ध्वस्त होत आहे आणि त्यांचे नेते या पृथ्वीवरून पूर्णपणे संपवले गेले आहेत", असा दावा ट्रम्प यांनी केला. 

इराणींना मारणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान

ट्रम्प यांनी पुढे म्हटले आहे की, "आमच्याकडे प्रचंड ताकद आहे. अमर्याद दारुगोळा आणि भरपूर वेळ आहे. आज या नीच लोकांचे काय होते, ते फक्त पहा. त्यांनी ४७ वर्षांपासून जगभरातील निर्दोष लोकांना मारले आहे आणि आता मी, अमेरिकेचा ४७वा राष्ट्राध्यक्ष म्हणून, त्यांना संपवत आहे. हे करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे", असे सांगत ट्रम्प यांनी इराणला इशारा दिला आहे. 

मोजतबा खामेनेई कदाचित जिवंत आहेत -ट्रम्प

ही पोस्ट करण्यापूर्वी फॉक्स न्यूजचा रिपोर्टनुसार द ब्रायन किल्मीड शोमध्ये ट्रम्प म्हणाले होते की, 'मला वाटते की, ते (मोजतबा खामेनेई) हे कदाचित (जिवंत) आहेत. मला वाटते की ते जखमी झाले आहेत, पण ते कुठल्यातरी अवस्थेत जिवंत आहेत.' 

ट्रम्प असेही म्हणाले की, 'देशांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाज नेली पाहिजेत. थोडे धाडस दाखवले पाहिजेत. यामध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही. त्यांच्याकडे कोणतेही नौदल उरलेले नाही आणि त्यांच्या सर्व युद्धनौका बुडवल्या आहेत.'

English
हिंदी सारांश
Web Title : Trump Threatens Iran Again: 'Killing Iranians is an Honor'

Web Summary : Donald Trump issued a fresh warning to Iran, boasting of America's immense power and vowing to eliminate Iranian leaders. He claimed Iran's military is decimated and stated that destroying the regime is an 'honor'.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणWarयुद्धFuel Crisisइंधन टंचाईCrude Oilखनिज तेल