मध्य-पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे शनिवारी इराणच्या अनेक शहरांवर भीषण हवाई हल्ले केले. पहिला मोठा हल्ला झाला तो इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या कार्यालयाजवळ. यानंतर राजधानी तेहरानसह अनेक शहरे हादरली. महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यांनंतर जागतिक पातळीवर तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. विशेष म्हणजे, पाकिस्तानने अनपेक्षितपणे आपली भूमिका बदलत, 'चांगला मित्र - चांगला मित्र' म्हणत, मित्रालाच झटका दिला आहे.
पाकिस्तानने रंग बदलला - 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान आणि अमेरिकेची मैत्री प्रचंड वाढली होती. पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी व्हाईट हाऊसचाही दौरा केला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी दोघांचेही कौतुक केले होते. मात्र, अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला करताच पाकिस्तानने आपल्या 'मित्राला' अर्थात अमेरिकेलाच झटका दिला आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांना फोन करून, इराणवर विनाकारण झालेल्या या हल्ल्यांचा इस्लामाबाद तीव्र निषेध करतो, असे म्हटले आहे. तसेच, डार यांनी तातडीने राजनैतिक चर्चा सुरू करून तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे.
दुसऱ्या बाजूला, रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीत राहून शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे इराणच्या जनतेला १९७९ पासून देशावर राज्य करणाऱ्या इस्लामिक नेतृत्वाविरुद्ध उभे राहण्याचे आवाहन केले. "आमचे काम पूर्ण केल्यानंतर, आपले सरकार सांभाळा. ते तुमचे असेल. ही तुम्हाला पिढ्यांसाठी कदाचित एकमेव संधी असेल," ट्रम्प यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे, मोठ्या लढाऊ कारवाया सुरू असल्याचे नमूद केले आहे. ते म्हणाले, "वर्षानुवर्षे तुम्ही अमेरिकन मदत मागत आहात, पण तुम्हाला ती कधीच मिळाली नाही."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे इराणच्या जनतेला थेट आवाहन केले आहे. "इराणच्या जनतेने स्वतःच्या नशिबाचा ताबा स्वतः घ्यावा आणि १९७९ पासून राज्य करणाऱ्या इस्लामिक नेतृत्वाविरुद्ध उभे राहावे," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच, "आपण अनेक वर्षे अमेरिकेकडे मदत मागीतली. मात्र ती तुम्हाला कधीही मिळाली नाही," असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
Web Summary : Following attacks on Iran, Pakistan seemingly shifted allegiance, criticizing the US and expressing support for Iran. Trump urged Iranians to overthrow their Islamic leadership. Russia offered mediation.
Web Summary : ईरान पर हमले के बाद, पाकिस्तान ने रुख बदला, अमेरिका की आलोचना की और ईरान के प्रति समर्थन जताया। ट्रंप ने ईरानियों से इस्लामिक नेतृत्व को उखाड़ फेंकने का आग्रह किया। रूस ने मध्यस्थता की पेशकश की।